IMPIMP

Rohit Pawar On BJP | भाजपने पक्ष फोडताना पवार कुटुंबही फोडले; रोहित पवार यांची खंत

by sachinsitapure

मुंबई : Rohit Pawar On BJP | भारतीय संस्कृतीत कुटुंब सर्वाधिक महत्त्वाचे असते. भाजपाने पवार कुटुंब (Pawar Family) फोडले. स्वहितासाठी संस्कृतीला तडा देण्याचा प्रयत्न केला. पक्ष फोडताना कुटुंबही फोडले. कुटुंब आणि पक्ष फोडणे हे लोकांना पटत नव्हते. त्यामागे कर्ताधनी कोण हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवले. त्यामुळे लोक आता भाजपाच्या विरोधात आहेत असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पवार कुटुंबाने अजित पवार (Ajit Pawar) यांना एकटे पाडले नाही, तर त्यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे ते एकटे पडलेत असे नमूद करतानाच अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shriniwas Pawar) यांनी घेतलेल्या पावित्र्याबद्दल रोहित पवार म्हणाले की श्रीनिवास काकांनी घेतलेली भूमिका सामान्य माणसांना पटणारी आहे. श्रीनिवास काकांनी घेतलेली भूमिका ही पवार कुटुंबाची आहे. ती संस्कृती आहे. सर्वसामान्य जनतेची तीच भूमिका आहे.

पवार कुटुंबीय म्हणून श्रीनिवास काकांनी घेतलेली भूमिका हा सामान्यांना पटणारी आहे.
म्हणून आज ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबत आहेत. पवार कुटुंबाची ओळख शरद पवार आहेत.
कुटुंबाची संस्कृती श्रीनिवास काकांनी बोलून दाखवली, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार म्हणाले ”अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला कुटुंब म्हणून वाईट वाटले.
कुटुंब म्हणून आम्ही सर्वजण एक आहोत. विचारांना पक्के आहोत, भूमिकेला पक्के आहेत.
अजितदादा आणि त्यांच्या कुटुंबाने वेगळी भूमिका घेतली. त्या चौघांची भूमिका वेगळी पण पवार कुटुंबात १०० हून अधिक लोक आहेत.”

Muralidhar Mohol – MLA Ravindra Dhangekar | पुण्यात मोहोळ विरूद्ध धंगेकर सामना रंगणार?, काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष

 

Related Posts