IMPIMP

Shivsena UBT Leader Ambadas Danve | उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?, नाराज अंबादास दानवे यांनी स्वत: केला खुलासा, ”एकनाथ शिंदेंबरोबर…”

by sachinsitapure

मुंबई : Shivsena UBT Leader Ambadas Danve | लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) उमेदवारी हवी असल्याचे मी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सांगितले आहे. मी पक्षाचा सैनिक आहे. समजा खैरेंना उमेदवारी दिली तरीही मी शिवसेना ठाकरे पक्षाचे काम करेन. मागच्यावेळीही तिकिट मिळाले नव्हते, तरीही निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केले आहे. काहीही झाले तरीही मी एकनाथ शिंदेंबरोबर (CM Eknath Shinde) जाणार नाही, असे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रचाराचा नारळ फोडल्याने उमेदवारीसाठी इच्छूक असलेले अंबादास दानवे नाराज आहेत. चंद्रकांत खैरे मला डावलत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. यामुळे दानवे लवकरच उद्धव ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण स्वता दानवे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.(Shivsena UBT Leader Ambadas Danve)

अंबादास दानवे म्हणाले, मी दहा वर्षांपासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. ही इच्छा लपवून ठेवलेली नाही.
पक्षप्रमुखांनाही माहीत आहे. अजून कोणताही चेहरा त्यांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अवधी आहे.
आता ते कुणाला उमेदवारी देतात ते पाहू.

एकांगीपणे कुणी वागत असेल तर त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे. चंद्रकांत खैरे मला कायम डावलत असतात,
ही गोष्ट आजची नाही. मी चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचे काम करत नाही उद्धव ठाकरेंसाठी काम करतो.
खैरे काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात त्याच्याशी मला काहीही घेणेदेणे नाही, असे दानवे म्हणाले.

अंबादास दानवे म्हणाले, मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. भूकंप वगैरे कुणी म्हणत असेल तर ते त्यांनाच विचारा.
या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही. नाराज असलो तरीही एकनाथ शिंदेंबरोबर जाणार नाही, असा खुलासा अंबादास दानवेंनी केला.

Pune Loni Kalbhor Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन फळ विक्रेत्याला मारहाण, लोणी काळभोर परिसरातील प्रकार

Related Posts