IMPIMP

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

by sachinsitapure

मुंबई : Shivsena UBT Loksabha Candidates | शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ही १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil), तर ठाण्यातून राजन विचारे (Rajan Vichare) यांना उमेदवारी दिली आहे.

तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून अनिल देसाई (Anil Desai) यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. तर पुण्याच्या मावळमधून संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांना तिकिट मिळाले आहे.

शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी

बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
मावळ – संजोग वाघेरे
सांगली – चंद्रहार पाटील
हिंगोली – नागेश आष्टीकर पाटील
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशीव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
ठाणे – राजन विचारे
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
मुंबई वायव्य – अमोल किर्तीकर
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
परभणी – संजय जाधव

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे, असे या पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Symbiosis Boys Hostel | पुणे : सिंम्बॉयसिस बॉईज होस्टेलमध्ये तरुणाच्या अंगावर अ‍ॅसिड सदृश रसायन फेकले

Related Posts