IMPIMP

Thane Police Transfer | ठाणे पोलिस आयुक्तालयातील 4 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

by nagesh
Maharashtra Police Inspector Transfer | As many as 225 police inspectors transfers in state police force, read complete list

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाइन Thane Police Transfer | काही दिवसांपूर्वी डान्स बार प्रकरणात नौपाडा (naupada ) आणि वर्तकनगरच्या (vartak nagar) वरिष्ठ पोलीस निरीक्षकांवर प्रथम दर्शनी दोषी तसेच कर्तव्यात कसूर केल्यामुळे पोलीस आयुक्तांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला (Jt CP dr. suresh mekhla) यांनी आदेश काढत ठाण्यातील आधिकऱ्यांची खांदेपालट (Thane Police Transfer) केली आहे. चार अधिकाऱ्यांवर वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. या बदलात नौपाडा पोलीस ठाण्याचा समावेश नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हिललाईन पोलीस ठाण्यात विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण सारीपुत्र यांना संधी दिली आहे. तर वर्तकनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांना पुन्हा प्रशासनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे चेतन काकडे यांना भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तर राबोडी पोलीस ठाण्याचे पंढरीनाथ भालेराव यांना विष्णुनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपविली आहे.

 

दरम्यान, डान्स बार प्रकरणावरुन वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना निलंबित केले आहे.
त्याच पोलीस ठाण्यात प्रशासन सांभाळणारे निरीक्षक संतोष घाटेकर यांच्याकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची संधी देण्यात आली होती.
मात्र आता त्या ठिकाणी सदाशिव निकम यांची नियुक्ती केल्याने घाटेकर यांचा कार्यकाळ औटघटकेचा ठरल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

Web Title : Thane Police Transfer | Internal transfers of 4 senior police inspectors in Thane Police Commissionerate

 

हे देखील वाचा :

khandala Ghat Accident | खंडाळा घाटात कार दरीत कोसळली; सुदैवाने फुटबॉलपटू ‘सुखरूप’

Pune Crime | मैत्रिणीबरोबरचे ‘ते’ व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी ! 42 वर्षीय तरूणाला ब्लॅकमेल करणारा ‘मिथुन’ पोलिसांच्या जाळयात

Raju Shetty | राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला जाहीर इशारा, म्हणाले – ‘आता मीदेखील करेक्ट कार्यक्रम करणार’

 

Related Posts