IMPIMP

Anti Corruption | 27000 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकाऱ्यासह रिक्षाचालक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन   – Anti Corruption | दाखल गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी रिक्षाचालकामार्फत 27 हजार रुपयाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह रिक्षाचालकाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption) सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.1) करण्यात आली आहे. जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत (Jaikheda police station) नामपुर दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मुरलीधर नवगिरे (PSI Milind Muralidhar Navgire) आणि रिक्षाचालक रमेश करचु गरुड (रा. काकडगाव ता. बागलाण, जि. नाशिक) असे लाच घेताना (Accepting Bribe) रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी नामपुर येथील तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांच्यावर जायखेडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र नामपुर येथे गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यामध्ये (FIR) कारवाई न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मिलंद नवगिरे यांनी 30 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीमध्ये 27 हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यानी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता नवगिरे यांनी लाचेची रक्कम रिक्षाचालक रमेश गरुड याच्याकडे देण्यास सांगितली.
त्यानुसार बुधवारी सापळा रचून रिक्षाचालक रमेश गरुड याला पोलीस उपनिरीक्षक मिलिंद नवगिरे यांच्यासाठी 27 हजार रुपयाची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
दोघांविरोधात जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी,
असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

Web Title : Anti Corruption | PSI Milind Muralidhar Navgire and Rickshaw driver arrested by acb nashik while taking bribe of 27000

 

हे देखील वाचा :

Anti Corruption | महिलेकडे 30,000 हजाराची लाच मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक

Pune Corporation | ‘भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात आल्यापासून पुणे मनपातील भ्रष्टाचाराने कळस गाठला’ – राष्ट्रवादी

125 Rupee Coin | जारी करण्यात आलं 125 रुपयांचे ‘हे’ विशेष नाणे, जाणून घ्या ते कसे आणि कुठून खरेदी करायचे?

 

Related Posts