IMPIMP

जबरदस्त ! 15 वर्षीय मुलाने केली कमाल, WhatsApp च्या तोडीचं बनवलं भारतीय App

by sikandershaikh
whatsapp

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)beetle app | गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या पॉलिसीमुळे सुरक्षिततेवरून युजर्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी व्हॉट्सअ‍ॅपसारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅपकडे आपला मोर्चा वळवळा असून त्याचा वापर करणं सुरू केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. याच दरम्यान एका १५ वर्षीय मुलाने कमाल केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या तोडीचं एक नवं भारतीय अ‍ॅप तयार केलं आहे. हरियाणा (Haryana) मधील रेवाडी जिल्ह्यातील नववीमध्ये शिकणाऱ्या हार्दिक कुमार दिवान या विद्यार्थ्याने हे अ‍ॅप तयार केलं आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

हार्दिकने बीटल नावाने अ‍ॅप (beetle app) तयार केलं आहे. हे एक चॅटिंग मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आहे. हे अ‍ॅप्लिकेशन प्ले स्टोरमध्ये (Play Store) उपलब्ध असून यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपच्या तोडीचे सर्व फीचर्स आहेत. बीटल अ‍ॅपचा व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे व्यावसायिक कामासाठी उपयोग करता येऊ शकतो असा दावा हार्दिकने केला आहे. तसेच यामध्ये चॅटिंग आणि व्हिडीओ रेकॉर्ड केले जाऊ शकत नाहीत. डेटा सुरक्षेच्या सर्व गोष्टींची खबरदारी यामध्ये घेण्यात आली आहे, अशी माहिती त्याने दिली आहे.

हार्दिकनं लॉकडाऊनमध्ये कुकिंग संबंधीचे व्हिडीओ (Video) यूट्यूब (YouTube) वर तयार करण्यास सुरुवात केली आहे. काही व्हिडीओ बनवल्यानंतर त्याला कॉम्पुटरमध्ये आवड निर्माण झाली. त्याने ऑनलाईन कोडिंग क्लासेस घेण्यास सुरुवात केली. त्यामधूनच बीटल या चॅटिंग अ‍ॅप तयार करण्याची सुरुवात झाली. हार्दिकने जवळपास तीन महिने या अ‍ॅपच्या कोडिंगवर काम केलं आहे. त्यानंतर ते गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वर नोंदवण्यात आलं. यामध्ये हळूहळू अपडेट केले जात असून लवकरच ते आयओएस (IOS) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. हार्दिकला भविष्यात सायबर क्राईम एक्सपर्ट वकील व्हायचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित नवनवीन माहिती ही समोर येत आहे. सायबर सिक्योरिटी एक्सपर्ट जॅक डॉफमॅनने सर्व व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला अलर्ट केलं आहे.
व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी त्वरित आपल्या सेटिंग्जमध्ये बदल करावेत अन्यथा त्यांचं व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक होऊ शकतं असं सांगण्यात आलं आहे.
हॅकर्सनी व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी नवा मार्ग शोधला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ज्यात मालवेअरद्वारे हॅकर्स दूरुनच युजर्सच्या फोनमध्ये येणारा सहा अंकी व्हेरिफिकेशन कोड मिळवू शकतात.
त्यानंतर हॅकर्स त्यांच्या डिव्हाईसवर युजर्सचं व्हॉट्सअ‍ॅप रन करू शकतात.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

स्कॅमचा, फसवणुकीचा खुलासा गेल्या वर्षी यूकेतील एका मीडिया हाऊसनेही केला होता.
त्यानंतरही अशाप्रकारचे हॅकिंगचे प्रकार वाढले आहेत.
अशा प्रकारचे हॅकिंग प्रकार रोखण्यासाठी फोनमध्ये एका सेटिंगद्वारे बदल केले जाऊ शकतात.
व्हॉट्सअ‍ॅप युजर्स हॅकिंगपासून वाचण्यासाठी एक सेटिंग करू शकतात. ही सेटिंग टू-स्टेप व्हेरिफिकेशन आहे.
यामध्ये एक सहा डिजिटचा कोड सेट करावा लागतो. या कोडमुळे दुसऱ्या डिव्हाईसवर लॉगइन करताना या कोडनेही करता येऊ शकतं.

Related Posts