IMPIMP

Covishield Vaccine | सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला यांच्याविरोधात खटला दाखल; लस घेतल्यानंतरही तयार झाल्या नाहीत अँटी बॉडीज

by bali123
Serum Institute | adar poonawalla tweets rs 10 crore overseas for covishield vaccine students quarantine in britain

लखनौ : वृत्तसंस्थाCovishield Vaccine | सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ आदर पूनावाला (CEO Adar Poonawala) यांच्याविरोधात लखनौ न्यायालयात (Lucknow Court) खटला दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हॅक्सिन (Corona vaccine) कोव्हिशील्ड (Covishield) घेऊनही शरिरात अ‍ँटी बॉडीज (Anti bodies) तयार न झाल्याने हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर संबंधित पोलीस ठाण्यांमधून (Police stations) अहवाल मागविण्यात आला आहे. या पुढील सुनावणी २ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

अ‍ॅड. प्रताप चंद्र (Advocate Pratap Chandra) यांनी हा खटला दाखल केला आहे. प्रताप चंद्र यांनी येथील गोविंद हॉस्पिटलमध्ये कोव्हिशिल्ड व्हॅक्सिनचा (Covishield vaccine) पहिला डोस घेतला होता. २८ एप्रिलला त्यांचा दुसरा डोस होता. मात्र व्हॅक्सिन (Vaccine) घेतल्यानंतरही त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांनी २५ मे रोजी अ‍ॅटीबॉडीज टेस्ट (Antibodies test) केली. मात्र, त्यांच्या शरीरात अ‍ॅटीबॉडीज तयार झाले नाही. सामान्य प्लेटलेटही कमी झाले. ज्यामुळे त्यांना संक्रमणाचा धोका वाढला. त्यामुळे या प्रकरणी अदार पूनावाला (Adar Poonawala) यांच्या विरोधात प्रताप चंद्र यांनी न्यायालयात खटला दाखल केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रताप चंद्र यांनी एफआयआर दाखल करण्यासाठी आदर पूनावाला यांच्यासहित ७ जणांची नावे न्यायालयात दिली आहेत. या अर्जात केंद्रीय औषध मानक नियंत्रण, आयसीएमआरचे महासंचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सहसचिव, राष्ट्रीय आरोग्य मिशन उत्तर प्रदेशचे संचालक, गोविंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लखनौ यांचे संचालक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
प्रताप चंद्र या सर्वाविरोधात फसवणूक आणि हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. न्यायालयाने स्थानिक पोलीस ठाण्याकडून अहवाल मागविला असून पुढील सुनावणी २ जुलै रोजी होणार आहे.

Web Titel : covishield vaccine antibody application in lucknow court against serum institute adar poonawalla

Related Posts