IMPIMP

अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल याचं निधन

by bali123
shocking news mandira bedi husband passed away due to heart attack

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टेलिव्हिजन (Television) आणि बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदीचे (Actress Mandira Bedi) पती राज कौशल (Raj Kaushal) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) आज सकाळी निधन झालं. राज यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण २७ जूनलाच मित्र परिवारासोबत पार्टी करत राज आणि मंदिराने वेळ घालवला होता. दरम्यान, ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं राज यांनी दिग्दर्शन केलं होत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत अभिनेता राहुल रॉयने (Actor Rahul Roy) शोक व्यक्त करताना म्हंटले आहे की, घरी असतानाच राजला पहाटे साडेचार वाजता हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजला रुग्णालयात हलवले मात्र त्यापूर्वीच त्याने अखेरचा श्वास घेतला होता. दरम्यान रोहितने सोशल मीडियावर (Social media) राज यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला भेटू शकलेला सुंदर व्यक्ती. आणि जर तुम्ही लकी असाल तरच तुम्ही त्याला मित्र म्हणू शकात. गुड बाय न म्हणतात तो निघून गेलाय. कसं व्यक्त व्हावं हेच कळत नाहीय.अशा शब्दात राहुलने दु:ख व्यक्त केलंय.

अभिनेता (Actor) म्हणून करियरची सुरुवात करणाऱ्या राज कौशलने (Raj Kaushal) १९९९ साली मंदिराबरोबर लग्न गाठ बांधली होती. मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा एक मुलगा आहे. तर २०२० मध्ये राज कौशल यांनी एका मुलीला दत्तक घेतलं असून तिचं नाव त्यांनी तारा असं ठेवलं आहे.

Web Titel : shocking news mandira bedi husband passed away due to heart attack

Related Posts