IMPIMP

Amravati Crime News | शिवसेना शहर प्रमुखांची निर्घुण हत्या; बारमध्ये दारु पिण्यासाठी आला असताना केला खून

by bali123
amravati crime news amravati shiv sena city president amol patil brutally murdered on amravati nagpur national highway

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइनAmravati Crime News | नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Nagpur National Highway) तिवसा (Tiwasa) बसस्थानकाजवळ असलेल्या आर्शिवाद वाईन बार (Ashirvad Wine Bar)  समोर शिवसेनेचे (Shivsena) तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील (Amol Patil) यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून डोक्यात वार करुन निर्घुण हत्या (Murder) करण्यात आली आहे.

अमोल पाटील (Amol Patil) याच्यावर दोन खुनाचा आरोप असून त्याला दीड महिन्यांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (District Superintendent of Police) २ वर्षांसाठी तडीपार केले होते. असे असतानाही तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन तो शहरात आला होता. त्याच्या पाळतीवर असलेल्यांनी डाव साधत त्याची हत्या केली.

अमोल जनार्दन पाटील (Amol Janardan Patil) (वय ३८, रा. तिवसा) हा शिवसेना शहर प्रमुख (Shiv Sena city chief) होता. त्याचा वाळूचा आणि बिअर बारचा व्यवसाय होता. अमोल पाटील हा आपल्या एका मित्रासोबत आर्शिवाद बार मध्ये दारु पिण्यासाठी आला होता. हल्लेखोरांनी अगोदर अमोल याच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्यानंतर त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार केले. अमोल याचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. काही तासातच चार जणांना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

संदीप रामदास ढोबळे (Sandeep Ramdas Dhoble) (वय ४२), प्रवीण रामदास ढोबाळे (Praveen Ramdas Dhobale), प्रवीण ऊर्फ अविनाश एकनाथ पांडे (Avinash Eknath Pandey) (वय ३०) आणि रुपेश घागरे (Rupesh Ghagre) (वय २२, सर्व रा. तिवसा) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत.

अमोल पाटील (Amol Patil) याची हत्या जुन्या वादातून झाली आहे.
यापूर्वी त्याला दोन खुन प्रकरणात अटक करण्यात आली होती.
हल्लेखोरांनी अगोदर कट रचून ही हत्या तडीस नेली.
त्यांनी अगोदर आर्शिवाद बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते.

Web Title : amravati crime news amravati shiv sena city president amol patil brutally murdered on amravati nagpur national highway

Related Posts