IMPIMP

तुमच्या सोबत सुद्धा झाला आहे ‘फ्रॉड’ तर ‘इथं’ करा तक्रार, पूर्ण पैसे मिळतील परत; जाणून घ्या कसे?

by omkar
Sangli Crime | dubai based company cheated with sangli grapes pomegranate businessman case registered

नवी दिल्ली : वृत्त संस्था – सरकारसत्ता ऑनलाइन – जर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा फ्रॉड (Fraud) किंवा फसवणूक झाली असेल तर तुम्हाला तुमच्या पैशांसाठी अस्वस्थ होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्ही केवळ तक्रार करायची आहे आणि तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील. इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्ट ऑफिसने यासाठी नवीन फॉर्म काढले आहेत, ज्याद्वारे तुम्ही फ्रॉड (Fraud) बाबत तक्रार करून आपल्या पैशासाठी क्लेम करू शकता.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने Simplified Standardized Claim Form लाँच केला आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पैशाचा क्लेम करू शकता. तुम्ही कोणत्या खात्यात क्लेम करू शकता जाणून घेऊयात.

Pimpri News | तरुणाविषयी खोटी माहिती सांगितल्याने लग्नासाठी ठेवले ‘झुलवत’; केली आत्महत्या

कोण करू शकतात क्लेम ?
पोस्ट पेमेंट बँकेने माहिती देताना म्हटले आहे की, जर ग्राहकांचे पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज अकाऊंट आहे आणि त्यांच्यासोबत एखादा फ्रॉड झाला आहे तर ते क्लेम करू शकतात. याशिवाय कॅश सर्टिफिकेट, मनी ऑर्डर, एसओपी आणि पीएलआय/आरपीएलमध्ये जर तुमची फसवणूक झाली आहे तर क्लेम करू शकता.

का काढला आहे हा फॉर्म ?
अजूनपर्यंत पोस्ट ऑफिसच्या सर्व सर्कलचे लोक आपल्या हिशेबाने वेगवेगळ्या फॉर्मचा वापर करत होते, ज्यांचा कंटेट वेगळा होता. तो संपूर्ण देशात एकसारखा करण्यासाठी हा फॉर्म लाँच केला आहे.

Coronavirus : मुलांच्या उपचाराची गाईडलाईन जारी, होणार नाही रेमडिसिविरचा वापर

अशी करा तक्रार
1. तक्रार करण्यासाठी प्रथम फॉर्म भरा.
2. यानंतर जमा करताना सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपी सुद्धा द्यावी लागेल.
3. या फोटोकॉपीमध्ये Photo ID आणि Address proof देणे आवश्यक आहे.
4. याशिवाय Passbook, Deposit reciept सुद्धा द्यावे लागेल.
5. याशिवाय तुम्हाला Original Passbook सुद्धा जमा करावे लागू शकते.
6. यानंतर बँकेकडून इन्व्हेस्टिगेशन केले जाईल.

10 जून राशिफळ : आज सूर्यग्रहण, या 5 राशीवाल्यांनी राहावे सावध, इतरांसाठी असा आहे गुरुवार

किती दिवसांचा वेळ लागेल
अशा प्रकारच्या फ्रॉडमध्ये तक्रार केल्यानंतर 7 दिवसांपासून 25 दिवसांपर्यंत वेळ लागू शकतो. तुमच्या केसवर सुद्धा अवलंबून आहे की तुम्हाला किती दिवसांचा वेळ लागेल. जर Forensic examination ची आवश्यकता असेल तर 3 महिन्यांपर्यंत सुद्धा वेळ लागू शकतो.

Mumbai Building Collapse | मुंबईत मालाडच्या मालवणी येथील 4 मजली रहिवासी इमारत कोसळली; 11 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी

Web Title- If you have been ‘fraud’, then complain ‘here’, you will get full refund; Learn how?

 

Related Posts