IMPIMP

अनैतिक संबंधातून पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी, कोरोनानं मृत्यू झाल्याचं सांगितलं, पण झाला पर्दाफाश

by pranjalishirish
Rajasthan woman murders husband told family died of corona police exposed in udaipur

राजस्थान : वृत्तसंस्था – राजस्थानातील Rajasthan उदयपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. तेथील एका महिलेने दिरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातून पतीचा खून केला आहे. याबाबत उदयपूर पोलिसांनी केलेल्या तपासात हे उघड झालं आहे. पोलिसांना पाच महिन्यापूर्वी अज्ञात मृतदेह सापडला होता. तर हे प्रकरण आता स्पष्ट झालं आहे. या प्रकरणामुळे भाऊ, मृतकाची पत्नी आणि अन्य पाच जणांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे.

Lockdown च्या विरोधात उदयनराजेंचे साताऱ्यात ‘भीक मांगो’ आंदोलन

याबाबत अधिक माहितीनुसार, आरोपींना या हत्येसाठी त्रिपुरा येथील प्रदीपदास नावाच्या व्यक्तीला सुपारी दिली होती. स्पेशल टीम आणि प्रतापनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास केला. या प्रकरणात मृत व्यक्तीचा थोरला भाऊ तपनदास आणि मृतकाची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं आहे. तर हा खून भाव, आणि मयताची पत्नी यांनी सुपारी देऊन खून केल्याचं पोलिस तपासात मान्य केलं आहे. तसेच, खून केल्यानंतर भावाने गावी जाऊन मृत्यूचं कारण कोरोना असल्याचं सांगितले. त्यानंतर सर्व प्रथापरंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिवसेनेचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्राला छळण्याचा केंद्राचा डाव’

यादरम्यान, उत्तमदास यांची एक कंपनी होती. वार्षिक उत्पन्न तब्बल ५ कोटीं होते. उत्तमदासने कंपनीमार्फत राजस्थान Rajasthan  तहसील कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी कंत्राट घेतलं होतं. ज्याचं काम राकेश नावाच्या आरोपींपैकी एक असलेला पाहत होता. त्यानंतर राकेश आणि त्याच्या ४ साथीदारांना १२ लाख रुपयांची सुपारी दिली गेली होती. उत्तमदास उदयपूरला आल्यानंतर राकेश आणि त्याच्या साथीदारांनी दारू पाजून उत्तमची गळा दाबून हत्या केली. आणि मृतदेह उदयसागर धबधब्याकिनारी फेकला. तर उत्तमदासच्या घराचा तपास केला असताना अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हत्या केल्यानंतर त्याच्या राहत्या गावी अंत्यसंस्कार पार पडले. अनेक दिवसांपासून उत्तमचं मृत्यू प्रमाणपत्र न मिळाल्याने रुपा त्याची संपत्ती आणि अनेक योजनांपासून वंचित होती. याच कारणामुळे तिने बनावट मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी हाती आरोपी सापडले आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Read More : 

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts