IMPIMP

चुलतभावाशीच तरुणीचे अनैतिक संबंध; वडिलांनी मुलीचे डोके केले धडावेगळे

by sikandershaikh
Mumbai Crime | eight abortions judges daughter descent crime against laws husband incidents highbrow

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) up girl | अनैतिक संबंधांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यातून गुन्हे ही वाढत आहे. अशा संबंधांसमोर अनेकांना नात्यांचाही विसर पडू लागला आहे. उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १८ वर्षीय तरुणीचे चुलत भावाशी अनैतिक संबंध होते हे ज्यावेळी मुलीच्या वडिलांना कळले तेव्हा त्यांनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलीचे डोके धडावेगळे केले. एवढेच नाही तर आपल्या मुलीचे कापलेले डोके हातात घेऊन वडील पोलीस ठाण्यात पोहोचले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ वर्षीय तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. या तरुणीचे कुटुंबातीलच चुलत भावाशी अनैतिक संबंध होते. दोन दिवसांपूर्वी दोघांनाही मुलीच्या वडिलांनी आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. त्यावेळी घटनास्थळावरून तरुणी पसार झाली होती. तेव्हापासून संतप्त झालेल्या वडिलांनी मुलीचा आणि तिच्या प्रियकराचा खून करण्याचे ठरवले. अखेर बुधवारी संध्याकाळी त्यांनी मुलीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करत तिचे डोके धडावेगळे केले. त्यानंतर वडिलांनी हेच डोके हातात घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या हातातील डोके पाहून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सदर व्यक्ती पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच घटनास्थळाची पाहणीही केली.

याबाबत हरदोईचे एसपी अनुराग वत्स यांनी सांगितले की, मुलीच्या प्रेमसंबंधामुळे मुलीचे वडील नाराज होते.
त्यामुळे त्यांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराचा खून करण्याचे ठरवले.
त्यानुसार घरात मुलगी एकटी असल्याचे पाहून वडिलांनी मुलीचे डोके धडावेळगे करून पोलीस ठाण्यात हजर झाले.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचेही वत्स यांनी सांगितले.

Jasprit Bumrah Marriage : विवाहबद्ध होणार क्रिकेटर जसप्रीत बुमराह ! अ‍ॅक्ट्रेस की कॉमेंटेटर ? ‘या’ 2 नावांची जोरदार चर्चा

Related Posts