IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या सांगवीमधील काटे पुरम चौकात योगेश जगतापचा 10 गोळ्या झाडून ‘गेम’ करणार्‍या 11 जणांवर FIR, पोलिसांकडून दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | 8-year-old girl shot, injured in husband-wife fight; Incident in Narhe, construction workers in police custody

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) सराईत गुन्हेगारावर गोळीबार (Firing in Pune) करुन खून (Murder) केल्याची घटना शनिवार (दि.18) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील काटे पुरम चौकात (Kate Puram Chowk) घडली. योगेश रविंद्र जगताप (Yogesh Ravindra Jagtap) असे खून (Pune Crime) झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी 11 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे. योगेशच्या दिशेने तब्बल 10 गोळ्या झाडून त्याचा खात्मा करण्यात आला होता.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

गणेश बाजीराव ढमाले आणि अक्षय केंगले (दोघे रा. सांगवी ) यांना अटक करण्यात आली आहे. तर गणेश हनुमंत मोटे (रा. कवडेनगर, सांगवी), अश्विन आनंदराव चव्हाण, अभिजीत बाजीराव ढमाले, प्रथमेश लोंढे, गणेश उर्फ मोनू संपकाळ, निखिल उर्फ डोक्या अशोक गाडुते, राजन उर्फ बबलु रवी नायर, महेश तुकाराम माने, निलेश मुरलीधर इयर (सर्व रा. सांगवी) यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेश रविंद्र जगताप (वय-25 रा. गांगर्डे नगर, काटे पुरम, पिंपळे गुरव) याने फिर्याद दिली (Pune Crime) आहे.

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे (Senior Police Inspector Sunil Tonpe) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करुन सराईत गुन्हेगार योगेश (Yogesh Jagtap) याचा खून (Murder in Pune) करण्याचा कट रचला. आरोपींनी परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतून झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून योगेश (Criminal Yogesh Jagtap) याच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर झालेल्या योगेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

घटना घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते.
आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.
पथकांनी आरोपींचा शोध घेऊन गणेश ढमाले आणि अक्षय केंगले या दोघांना सांगवी (Sangvi News) येथून अटक केली.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल तांबे (Police Inspector Sunil Tambe) करीत आहेत.

 


Web Title :- 
Pune Crime | FIR against 11 persons for firing on Criminal Yogesh ravindra Jagtap at Kate Puram Chowk in Sangvi, Pimpri Chinchwad Pune Sangvi Police Arrest Two Murder News

 

हे देखील वाचा :

Amit Shah Visit to Pune | अमित शहा यांची पुणे भेट; भाजपच्या पराभवाची कबुली – माजी आमदार मोहन जोशी

PPF Investment | PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या ‘या’ तारखेला आठवणीने पैसे जमा करा, अन्यथा होईल नुकसान

Brown Rice Benefits | व्हाईट राईसऐवजी का खावा ब्राऊन राईस? डायबिटीजमध्ये सुद्धा लाभदायक; जाणून घ्या

 

Related Posts