IMPIMP

PPF Investment | PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या ‘या’ तारखेला आठवणीने पैसे जमा करा, अन्यथा होईल नुकसान

by nagesh
Changes In PPF | changes in ppf account rules major changes in public provident fund know before investment

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनसर्वसामान्यांना बचत करता यावी यासाठी भारत सरकारकडून (Government of India) गुंतवणुकीसाठी अनेक लहान बचत योजना (Savings scheme) उपलब्ध आहेत. यामध्ये पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF Investment), सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS), नॅशनल सेव्हिग सर्टिफिकेट (NSC), किसान विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धी योजना (SSY) अशा अनेक योजना आहे. या योजनांचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हमखास परतावा मिळतो. यासाठी तुम्हाला दरमहा ठरावीक रक्कम जमा करावी लागते. मात्र यापैकी PPF ही अशी योजना (PPF Investment) आहे ज्यामध्ये दरमहा देय तारखेपर्यंत पैसे जमा करणे महत्त्वाचे होते. PPF खाती पोस्ट ऑफिस (post office) किंवा बँकेत (bank) उघडली जातात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

PPF मध्ये तारखेला महत्त्व
पीपीएफमध्ये कोणत्या तारखेला गुंतवणूक (PPF Investment) करता आणि कोणत्या तारखेला तुम्ही पैसे जमा करता त्यानुसार व्याजदर ठरतो. पीपीएफमध्ये व्याजदर (Interest rate) दरवर्षी मिळत असतो, मात्र चक्रवाढ व्याजाची गणना दर महिन्याला केली जाते. पीपीएफ खात्याच्या नियमांनुसार, पीपीएफ खात्यावरील व्याज 5 तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात जमा असलेल्या किमान शिलकीच्या आधारावर मोजले जाते.

 

अन्यथा परताव्यावर होईल परिणाम
जर एखाद्या पीपीएफ खातेधारकाने कोणत्याही महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत त्याच्या पीपीएफ खात्यात पैसे जमा केले, तर तो त्या महिन्यासाठी पीपीएफ व्याजासाठी देखील पात्र असेल. मात्र तुम्ही 5 तारखेनंतर पैसे जमा केले तर तुम्हाला व्याजाचे नुकसान होईल. याचा परिणाम तुमच्या परताव्यावर होईल. दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात पैसे जमा करणे आवश्यक आहे.

PPF खात्याचे फायदे
दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी हा एक चांगला आणि सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये 15 वर्षांसाठी गुंतवणूक केली जाते. निवृत्तीच्या वेळी त्याचा खूप फायदा होतो. पीपीएफमधून मिळणारे उत्पन्न करमुक्त (Tax free) आहे. तुम्ही आयकर कलम 80C (Income tax section 80C) अंतर्गत यावर कर सूट देखील घेऊ शकता. यावर मिळणारे व्याज हे करमुक्त आहे. सध्या पीपीएफ वर 7.1 टक्के व्याज आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर 1.5 लाख रुपयापर्यंत कर कपातीचा लाभ मिळतो.
तसेच मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम (Maturity amount) या दोन्हींवर कर सवलत उपलब्ध आहे.
त्यामुळे केवळ मॅच्युरिटीच्या वेळीच नाही तर वार्षिक आधारावर करमुक्तीचा हा एक चांगला पर्याय आहे.
कर आकारणीच्या ट्रिपल ई मॉडेलमुळे हा चांगला परतावा देणारे प्रोडक्ट मानले जाते.

 

किती पैसे जमा करावे लागतील?
PPF मध्ये, तुमचे खाते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला वार्षिक किमान 500 रुपये जमा करावे लागतील.
तसेच तुम्ही एका वर्षात तुमच्या खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करु शकता.
हे खाते 15 वर्षाच्या लॉक-इन कालावधीसह येते. सध्या तुम्हाला पीपीएफ अंतर्गत 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- PPF Investment | investing in ppf then be sure to deposit money on this date otherwise impact on return

 

हे देखील वाचा :

Brown Rice Benefits | व्हाईट राईसऐवजी का खावा ब्राऊन राईस? डायबिटीजमध्ये सुद्धा लाभदायक; जाणून घ्या

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले – ‘शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस’

Prashant Jagtap | छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडणवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची; प्रशांत जगताप यांची टीका

 

Related Posts