IMPIMP

Amit Shah Visit to Pune | अमित शहा यांची पुणे भेट; भाजपच्या पराभवाची कबुली – माजी आमदार मोहन जोशी

by nagesh
Amit Shah Visit to Pune | Amit Shah's visit to Pune; Confession of BJP's defeat - Former MLA Mohan Joshi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Amit Shah Visit to Pune | राष्ट्रीय राजकारणातील भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात (Amit Shah Visit to Pune) बोलवावे लागले. ही भाजपच्या महापालिकेच्या (Pune Corporation) येत्या निवडणुकीतील पराभवाची कबुलीच आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Former MLA Mohan Joshi) यांनी केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

गेल्या पाच वर्षात भाजप, महापालिकेत एकही भरीव काम उभे करु शकलेले नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या प्रकल्पाच्या उदघाटनासाठी अमित शहा यांना भाजप नेते बोलावू शकलेले नाहीत. पुणेकरांनी भाजपचा हा सगळा कारभार पाहिलेला आहे, त्यामुळे अमित शहा येवोत (Amit Shah Visit to Pune) अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येवोत भाजपचा महापालिका निवडणुकीतील (Pune municipal election) पराभव अटळ आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी व्यक्त केली.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) यांच्या स्वागतासाठी भाजपने शहरात मोठमोठे फलक लावले. त्यावर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अमित शहा यांचे मोठमोठे फोटो होते. पण, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो त्या फलकांवर नव्हते. राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करुन घ्यावयाचा. ‘ ‘मुँह में राम, बगल में छुरी’ ही भाजपची नीती पुणेकरांना पहायला मिळाली, अशीही टीका मोहन जोशी यांनी केली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

वाढत्या महागाईसंदर्भात ‘अमित शहा जवाब दो’ अशी हॅशटॅग मोहीम सोशल मिडियावर काँग्रेस पक्षाने आज (रविवार) पासून चालू केली आहे,
अशी माहिती मोहन जोशी यांनी दिली. या संदर्भात बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले, देशात महागाईचा उच्चांक झाला आहे.
इंधन, धान्य, खाद्यतेल,भाज्या यांचे भाव वाढत आहेत. घरगुती गॅसची किंमत एक हजार रुपये झाल्याने महिलांना पुन्हा चुली पेटविण्याची वेळ आली आहे.
महागाई वाढत असताना अमित शहा अथवा भाजपचे कोणतेही नेते त्याविषयी बोलायला तयार नाहीत.
त्यामुळे जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मिडियावर ‘अमित शहा जवाब दो’ ही हॅशटॅग मोहीम हाती घेण्यात आली आहे.

 

Web Title :- Amit Shah Visit to Pune | Amit Shah’s visit to Pune; Confession of BJP’s defeat – Former MLA Mohan Joshi

 

हे देखील वाचा :

PPF Investment | PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या ‘या’ तारखेला आठवणीने पैसे जमा करा, अन्यथा होईल नुकसान

Brown Rice Benefits | व्हाईट राईसऐवजी का खावा ब्राऊन राईस? डायबिटीजमध्ये सुद्धा लाभदायक; जाणून घ्या

Corporator Pramod Bhangire | प्रमोद भानगिरेंनी स्वखर्चाने केलेल्या प्रभाग 26 मधील विकासकामाचे उद्घाटन; शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले – ‘शिवसेना नगरसेवकांची विकासकामे इतर नगरसेवकांपेक्षा अधिक सरस’

 

Related Posts