IMPIMP

पुणेकरांसाठी दिलासादायक ! केंद्र सरकारकडून लसींचा थेट पुरवठा, 2 लाख 48 हजार लसी प्राप्त

by Team Deccan Express
2 lakh 48 thousand vaccines will be provided central government to pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. राज्यात कोव्हिड-19 विरोधी लशींचा तुटवडा असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले होते की, राज्यात तीन दिवस पुरेल एवढाच लसींचा साठा आहे. जर येत्या तीन दिवसांत लस मिळाली नाही तर लसीकरण बंद करावे लागेल असे टोपे यांनी सांगितले होते. आता केंद्र सरकारने central government पुणेकरांना दिलासा दिला आहे. केंद्राने पुणे जिल्ह्याला थेट लसींचा पुरवठा केला आहे.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. मोहोळ यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याला 2 लाख 48 हजार कोरोना लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. यातील पुणे शहराला 40 टक्के, ग्रामीणला 40 टक्के तर पिंपरी-चिंचवडला 20 टक्के लस मिळणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले. तसेच येत्या रविवारी देखील पुणे जिल्ह्याला आणखी 1 लाख 25 हजार लसींचा पुरवठा होणार असल्याचे महापौर म्हणाले.

कोरोना लशीच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण प्रक्रिया ठप्प झाली होती. पुणेकरांना लशीकरण केंद्रावर जाऊन लस न घेताच माघारी फिरावं लागलं होते. मात्र, आता पुणेकरांच्या लसीकरणामध्ये कोणतीही बाधा न येता लसीकरण मोहिम सुरु राहिल, अशी अपेक्षा आहे. केंद्राने central government देशात सर्वाधिक कोरोना उद्रेक झालेल्या पुणे शहरावर कृपादृष्टी केली आहे.

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

पुण्यातील काय परिस्थिती ?

मंगळवारी (दि.6) पुण्यात कोव्हिशिल्ड लशीचे 15 हजार 300 आणि कोव्हॅक्सीन लशीचे केवळ 120 डोस शिल्लक असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली होती. देशातील कोरोना हॉटस्पॉटमध्ये पुणे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात कोरोना बाधितांचा पॉझिटिव्ह रेट 35 टक्के आहे.

Read More : 

Radhakrushna Vikhe-Patil : ‘मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना एकच काम दिलंय, केंद्रावर आरोप करा अन्…’

 

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

गोंदिया : नागझिरा अभयारण्यात वणवा विझविताना तीन मजुरांचा होरपळून मृत्यु

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

MPSC परीक्षेबाबत राज ठाकरेंचा CM उद्धव ठाकरेंना फोन, केली ‘ही’ मागणी

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

Related Posts