IMPIMP

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! CBI कडून तपास सुरु, टीम NIA कार्यालयात दाखल

by pranjalishirish
cbi officials arrive at nia office for investigation over allegation against anil deshmukh

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय (CBI) चौकशीच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्य सरकारला दिलासा मिळाला नाही. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच देशमुख आणि राज्य सरकारने केलेल्या दोन स्वतंत्र याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे सीबीआयला चौकशी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सीबीआय तपासाला वेग आला आहे.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

सर्वोच्च न्यायालायने देशमुख यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर सीबीआयने आपल्या तपासाला सुरुवात केली आहे. सीबीआयचे अधिकारी आज (शुक्रवारी) सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) कार्यालयात दाखल झाले होते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली गाडी प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. सध्या सचिन वाझे हे एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंह यांनी पत्रातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचा उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय CBI एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय CBI चौकशीच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या विरोधातील सीबीआयची प्राथमिक चौकशी करण्याच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायलायने नकार दिला. उच्च न्यायालयाने 15 दिवसांत सीबीआयने प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, सीबीआयने चौकशी सुरु केली आहे.

 

Read More : 

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

Pimpri : ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या आदित्य बिर्ला हॉस्पीटल, लोकमान्य हॉस्पीटल अन् डॉ. डी.वाय हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts