IMPIMP

जावडेकरांच्या आरोपांना राजेश टोपेंचे प्रत्युत्तर, म्हणाले -‘लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय’

by pranjalishirish
national average of corona vaccine wastage spent in name of maharashtra rajesh tope s reply to prakash javadekar s allegations

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत असताना केंद्राकडून लीसचा पुरवठा कमी होत असल्याचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. तसेच लस उपलब्ध नसल्याने राज्यातील लसीकरण केंद्र बंद करावी लागत असल्याने केंद्राने आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करावा अशी मागणी केली. यानंतर प्रकाश जावडेकर  Prakash Javadekar यांनी काही आकडेवारी देत महाराष्ट्रात 6 टक्के कोरोना लसी वाया गेल्याचा आरोप केला आहे. हा आरोप राजेश टोपे यांनी खोडून काढला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सुपुत्राने महाराष्ट्राची बदनामी करु नये अशी माफक अपेक्षा असल्याचे सांगत जावडेकरांना टोला लगावला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कारवाईचे संकेत, म्हणाले – ‘भिडेंचे वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी’

सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. लस उपलब्ध नसल्याने राज्यातील लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा होत नसल्याचा आरोप काही दिवसांपासून राज्य सरकाकडून केला जात आहे. राज्य सरकारच्या दाव्यावरुन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर घणाघाती आरोप करत आकडेवारी शेअर केली. त्यानंतर जावडेकरांनी Prakash Javadekar  राज्य सरकारवर निशाणा साधला होता.

शरद पवारांची केंद्र सरकारसोबत चर्चा, केंद्र सरकारने दिले ‘हे’ आश्वासन

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या पत्रानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना सांगितले की, केंद्र सरकारने महाराष्ट्राला केवळ साडे सात लाख कोरोना डोस दिले आहेत. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा या राज्यांना महाराष्ट्रापेक्षा जास्त लस दिल्या आहेत.तसेच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असताना लसीचे फक्त साडेसात लाख डोस का ? असा सवाल उपस्थित करत लसीअभावी काही जिल्ह्यात लसीकरण बंद होण्याची भीती व्यक्त केली होती. केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप टोपे यांनी केला.

Gold Price Today : सोनं 250 रुपयांनी तर चांदी 360 रुपयांनी महागली !

महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले

राजेश टोपेंच्या आरोपांना उत्तर देताना प्रकाश जावडेकर Prakash Javadekar यांनी सांगितले की, राज्याकडे आजही 5 ते 6 दिवसांचा लसींचा साठा शिल्लक आसल्याचा दावा जावडेकर यांनी केला. प्रकाश जावडेकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रात 5 लाख डोस तर वाया गेले. कारण नियोजनच व्यवस्थित केलं जात नाही. एका वायलमध्ये 10 लोकांना डोस दिला जातो. त्याचं व्यवस्थित नियोजन केलं जायला हवं. राज्य सरकार आपलं काम नीट करत नाही आणि दुसऱ्यांवर दोष देत आहे. हे म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाँटे अशी स्थिती आहे. कुठेही 3 ते 4 दिवसांचा साठा नेहमीच असतो. त्यापुढे तो येतच असतो. जेवढं तुम्ही लसीकरण करता, त्यापेक्षा जास्त डोस केंद्र सरकार देते, असे जावडेकर म्हणाले.

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नाववर खपताय

राजेश टोपे यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावत ट्विट करुन स्पष्टीकरण दिले आहे. आरोग्य मंत्री म्हणाले, लसीकरणावरुन महाराष्ट्र शासन राजकारण करत नाही. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे, ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे, असे टोपे म्हणाले. दुसऱ्या ट्विटमध्ये टोपेंनी म्हटले की, आपल्यासारख्या महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही, याची दक्षता घेईल ही माफक अपेक्षा आहे.

Read More : 

Pune : जमलेल्या लग्नाला कोरोनाची आडकाठी, खऱेदीअभावी लग्न पुढे ढकलले

Pandharpur : अजित पवार भाजप नेत्यांवर गरजले, म्हणाले-‘अरे तुला कुठं….’

Jayant Patil : भाजप बोलतेय तशीच चौकशी NIA कडून सुरु, सचिन वाझेचा म्होरक्या कोण?

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts