IMPIMP

Pandharpur By-Election : अभिजीत बिचुकलेंची घोषणा ! आता पंढरपुरातून पोटनिवडणूक लढवणार

by pranjalishirish
abhijeet bichukale will now contest election pandhapur

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले (Big Boss Marathi fame Abhijit Bichukale) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. पंढरपूर पोटनिवडणुकीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. निवडणूक लागली की, भर अर्ज आणि रहा उभा अशाच काही पावित्र्यात जणू ते असतात. आता आपल्या या घोषणेमुळं ते पुन्हा चर्चेत आहेत.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमदार भारत भालके निधनामुळं पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांना तर भाजपकडून समाधान अवताडे यांना या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. काही वेळात ते आपला अर्जही दाखल करतील. भावनिक राजकारण विरोधात भाजप असा हा सामना आहे. अशात आता आणखी कारण आहे ज्यामुळं ही पोटनिवडणूक चर्चेत राहणार आहे. ते कारण आहे ते म्हणजे बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले  Abhijit Bichukale . बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

काय म्हणाले अभिजीत बिचुकले ?

एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना अभिजीत बिचुकले Abhijit Bichukale  म्हणाले, विठुरायाच्या नगरीची नेत्यांनी केलेली दुरावस्था बघवत नाही आणि राज्यातील उद्दाम प्रशासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी मी पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे असं त्यांनी सांगितलं.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

या निवडणुकीत निवडून येणार

पुढं बोलताना ते म्हणाले, मंगळवेढा येथील पाणी प्रश्न आजवर कोणीच का सोडवला नाही. आपण या निवडणुकीत निवडून येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘POK वर ताबा मिळवणे विसरून जा’; स्वामींचा भाजपला ‘घरचा आहेर’

आजवर अनेक निवडणुका लढवल्या, डिपॉझिट जप्त झालं तरीही निवडणूक लढवण्याची हौस मात्र कायम

अभिजीत बिचुकले यांनी आजवर अनेक निवडणुका लढवल्या आहेत. त्यांनी राज्यसभा खासदार उदयनराजे भासले यांना लोकसभा निवडणुकीत आव्हान दिलं होतं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक देखील त्यांनी लढवली होती. अनेकदा त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आहे. तरीही त्यांची निवडणूक लढवण्याची हौस मात्र कायम असल्याचं दिसत आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts