IMPIMP

गेल्या 4 वर्षांत 170 आमदारांचा काँग्रेस पक्षाला ‘राम राम’; जाणून घ्या भाजपचा आकडा किती ?

by bali123
adr report says 170 mla congress left party last four years

सरकारसत्ता ऑनलाइन – केंद्रीय निवडणूक आयोगानं 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आणि इतर पक्षांनी आपापली ताकद पणाला लावल्याचं दिसत आहे. अशातच आता एक अहवाल समोर आला आहे, ज्यामधून कोणत्या पक्षातून किती आमदारांनी दलबदल केला, याची माहिती समोर आली आहे. यानंतर आता कुणाचा फायदा झाला आणि कुणाचं नुकसान झालं याबाबत चर्चा रंगताना दिसत आहेत.

गेल्या 4 वर्षांत काँग्रेस congress च्या शेकडो आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस congress ला मोठी गळती लागल्याचं चित्र देशानं पाहिलं आहे. गेल्या 4 वर्षांत विविध राज्यांतील निवडणुकीवेळी काँग्रेसच्या शेकडो आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR या संस्थेनं याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

काँग्रेसला मोठी गळती
2016 ते 2020 या 4 वर्षांच्या काळात विविध राज्यांत तब्बल 170 आमदार असे आहेत, ज्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि इतर पक्षात प्रवेश केला. अशी माहिती आहे की, भाजपच्या केवळ 18 आमदारांनी पक्ष सोडला आहे. आपल्या पक्षाला राम राम ठोकत याच कालावधीत निवडणूक लढवणाऱ्या 405 आमदारांपैकी 182 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून, 28 आमदार काँग्रेसमध्ये गेले तर 25 आमदार तेलंगणा राष्ट्र समितीत गेले, असंही या अहवालात नमूद केलं आहे.

पक्षबदलामुळं सत्तांतर
मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, गोवा, मणिपूर आणि कर्नाटक या राज्यांत आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केल्यानं तेथील सरकार बदललं. यापैकी गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील सत्ता बदलाची चर्चा देशभर सुरू होती. या रिपोर्टनुसार, सदर कालावधीत पक्ष बदलून राज्यसभेची निवडणूक लढवणाऱ्या 16 खासदारांपैकी 10 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं गेलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपच्या फक्त 5 आमदारांनी फारकत घेत अन्य पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे 7 राज्यसभा सदस्य असे आहेत, ज्यांनी इतर पक्षात प्रवेश केला. सदर अहवालातून याबाबतची ही माहिती समोर आली आहे.

प. बंगालमध्ये अनेक टीएमसी नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आता पूर्ण देशाचं लक्ष हे प. बंगालमधील निवडणुकीकडे लागलं आहे. भाजप आणि टीएमसी यांच्यात जोरदार टक्कर होताना दिसत आहे. भाजपनं ममता बॅनर्जींचा सामना करण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर टीएमसीच्या अनेक पदाधिकारी, नेते, मंत्री, आमदार यांनी पक्षाला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता निवडणुकीची रंगत वाढताना दिसत आहे.

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

पुण्यात लॉकाडाउन नाहीच ! उपाययोजनांची कडक अंमलबजावणी

Related Posts