IMPIMP

पवार अन् मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीनंतर मंत्री मंडळात फेर बदलाचे ‘संकेत’; गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्याची नियुक्ती केली जाण्याची शक्यता

by bali123
After the meeting between Sharad Pawar and Chief Minister Uddhav Thackeray, there are indications of a reshuffle in the cabinet, the possibility of choosing another minister for the post of Home Minister

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांच्यात वर्षा बंगल्यावर दोन तास महत्वाची बैठक झाली. यात महत्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मंडळ फेरबदल संदर्भातही महत्वाची चर्चा बैठकीत झाल्याचे समजते. काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे रिक्त झालेले वन मंत्रीपदी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील गृहमंत्रीपदी नवीन मंत्र्यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण ते आताच्या सचिन वाझे प्रकरणापर्यंत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख चोख कामगिरी करू शकले नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या दोन्ही जेष्ठ नेत्यांमध्ये आहे. अनिल देशमुख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांचे विश्वासू सहकारी आहेत पण पवार त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा याआधीच मंजूर झाला असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारीही
शिवसनेच्या मंत्री मंडळाबाहेरील नव्या व्यक्तीवर सोपवण्याची तयारी सुरू आहे.
काँग्रेस अंतर्गतही काही फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

शरद पवारांनी बोलावली राष्ट्रवादीच्या नेते अन् मंत्र्याची बैठक, ‘या’ 3 महत्वाच्या प्रकरणांचा घेणार आढावा

मधुकर पिचड पडणार एकाएकी? राष्ट्रवादी खेळतोय ‘ही’ खेळी

भाजप आमदाराचे वादग्रस्त विधान, म्हणाले – ‘ताजमहालचे नाव बदलून राम महल करणार’

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मंत्रालयाचे कामकाज आता एक दिवसाआड

मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘लोकं पंतप्रधान मोदींना लवकरच देव मानतील’

Related Posts