IMPIMP

Ajit Pawar | ‘हे सरकार सर्व जाती धर्मासाठीचं आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारं सरकार’

by nagesh
Ajit Pawar | will theaters and cinemas state start operating 100 cent capacity

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळासोबत घेतलेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्याबाबत आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. काही जिल्ह्यात आदिवासी बहुल जिल्हे असल्यानं तिथं ओबीसींच्या (OBC) जागांवर परिणाम होतो. त्यांच्यावर अन्याय होतो. आपल्याला जे काही काही आरक्षण 52 टक्के आहे. पालघर, नंदुरबार इतर वर्गाला जागा राहत नाहीत. अनेकांचे म्हणणे होते की, जिथं अन्याय होतोय त्याची दुसरीकडे भरपाई करायला हवी, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अजित पवार पुढे म्हणाले, छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) अध्यक्षतेखाली आधी समिती तयार केली होती. त्यांनी प्रस्ताव ठेवला होता. त्यावर चर्चा झाली आणि त्यात मार्ग काढला.
ज्यांना कुठेही आरक्षण (Reservation) मिळत नाही त्यांनाही जागा ठेवल्या आणि काही जागा ओबीसींना ठेवल्या आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या टीकेवर बोलताना अजित पवार म्हणाले, एकमताने सरकारने निर्णय घेतला आहे की, कसं पुढे जायचं याची माहिती दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. उशिरा सुचलेलं शहाणपण अशाही प्रतिक्रिया दिल्या.
लोकशाहीने त्यांना अधिकार आहे ते टीका करु शकतात.
उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील असलेलं सरकार हे सर्व जाती धर्मांसाठीचं आणि सर्वांना एकत्र घेऊन जाणारं सरकारं असल्याचे पवार म्हणाले.

 

अध्यादेश काढण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाला (Election Commission) स्वातंत्र्य आहे आणि त्यात आपण ढवळाढवळ करु शकत नाही. ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत.
कोणत्याही घटकाला नाराजी राहणार नाही यासाठी प्रयत्न केले तर होऊ शकेल.
केंद्राला 50 टक्क्यांची अट काढून टाकण्याची आणि राज्याला अधिकार देण्याची मागणी केली पण तसं काही झालं नाही.
कोणालाही आरक्षण देताना मूळ आरक्षणाला धक्का लागू नये अशी आमची भूमिका असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

केंद्राने केंद्राचे काम करावे, परंतु राज्याचे जे अधिकार आहेत त्यावर गदा येऊ नये.
राज्याचे अधिकार तसेच रहावेत. मुद्रांक शुल्क (Stamp duty) आणि जीएसटीमधून (GST) राज्याला कर मिळतो.
जे काही ठरलंय त्याप्रमाणे चालु रहावे. कोरोनाच्या संदर्भात ज्या सवलती आधी दिल्या आहेत त्या द्याव्यात असंही अजित पवार म्हणाले.

 

Web Title : Ajit Pawar | deputy cm ajit pawar obc reservation gst petrol diesel ats maharashtra

 

हे देखील वाचा :

Sambhaji Raje Chhatrapati | आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; संभाजीराजे म्हणाले – ‘आता तरी सरकराने…’

Parambir Singh | परमबीर सिंह यांना हाय कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली

BJP Kolhapur | ‘त्या’ चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारी घेतलीय; ‘BJP’ कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

 

Related Posts