IMPIMP

Sambhaji Raje Chhatrapati | आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; संभाजीराजे म्हणाले – ‘आता तरी सरकराने…’

by nagesh
Sambhaji Raje Chhatrapati | young man commits suicide for maratha reservation sambhaji raje aggressive against uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मराठा आरक्षण (Maratha reservation) नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर (Sadashiv Shivaji Bhumbar) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करुन मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन सरकारवर हल्ला चढवला आहे.

 

‘अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलन केली. मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. माझी सूचना आहे कि सरकारने आता जागं व्हावं आणि त्याविषयात जातीने घालावं’, असं म्हणत संभाजीराजे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना देखील एक आवाहन केलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सरकारला अर्धवट माहिती देऊन दिशाभूल

प्रशासनातील काही अधिकारी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारला अर्धवट माहिती देऊन सरकारची दिशाभूल करीत आहेत. मात्र, माझी सूचना आहे कि सरकारने आता तरी जागं व्हावं आणि याविषयात जातीने लक्ष घालावं. अधिकाऱ्यांवर अवलंबून न राहता आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरु करावी. त्याच, प्रमाणे, समाजाच्या इतर मागण्यांवर ठोस कार्यवाही करुन तातडीने अंमलबजावणी करावी, असं सांगत यावेळी संभाजीराजे यांनी मराठा समाजाच्या मागण्यंप्रश्नी सरकारला धारेवर धरले आहे. आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरुण नैराश्यात जात आहेत. आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. देशाचं भविष्य असणारी तरुण पिढी अशा परिस्थितीत जाणं हे राष्ट्रास हितकारक नाही, अशी चिंता देखील यावेळी त्यांनी व्यक्त केली.

 

 

शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही नाही

 

तरुणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्यावतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था (Sarathi Sanstha), आण्णासाहेब पाटील महामंडळ (Annasaheb Patil Mahamandal) यांच्या माध्यमातून उच्चशिक्षण, कौशल्य विकास (Skill development), रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केल्या. मात्र, शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी आमच्या पदरी निराशाच पडली, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे

संभाजीराजे यांनी यावेळी सदाशिव भंबुर या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करत मराठा तरुणांना असं कोणताही टोकाचं पाऊल न उचलण्याची विनंती केली आहे.
ते म्हणाले, मी कळकळीची विनंती करतो की मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे.
तुमचं धैर्य हीच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिंमत हारु नका. असा मार्ग निवडू नका.
आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ.

 

Web Title : Sambhaji Raje Chhatrapati | young man commits suicide for maratha reservation sambhaji raje aggressive against uddhav thackeray

 

 

हे देखील वाचा :

Parambir Singh | परमबीर सिंह यांना हाय कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली

BJP Kolhapur | ‘त्या’ चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारी घेतलीय; ‘BJP’ कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Supreme Court | ‘एससी’, ‘एसटी’च्या बढत्यांसाठी आरक्षण ! 2018 च्या निर्णयाचा फेरविचार नाही, SC ची स्पष्टोक्ती

 

Related Posts