IMPIMP

BJP Kolhapur | ‘त्या’ चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारी घेतलीय; ‘BJP’ कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

by nagesh
Chandrakant Patil On Mahavikas Aghadi Govt | ministers in mahavikas aghadi should fill their bags chandrakant patil in kolhapur

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन –  BJP Kolhapur | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना सामान्य कार्यकर्ता भेटू शकत नाही. अशी एक आरोप करणारी पोस्ट सध्या सोेशल मिडियावर व्हायरल (Viral) होत आहे. मात्र, ती पोस्ट भाजप कार्यकर्त्यांने व्हायरल केली असल्याचं समोर आलं आहे. यावरुन भाजप (BJP Kolhapur) पक्षात मोठा गोंधळ उडाला आहे. मात्र, या व्हायरल पोस्टवरुन (Viral post) एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने त्याला प्रत्युत्तर देणारी पोस्टच व्हायरल केली आहे. या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या व्हायरल पोस्टवरुन चर्चेला उधाण आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

भाजपच्या शहर कार्यकारिणीत समन्वय नाही. सर्व सूत्रे चौघांकडे आहेत. हे चौघे केवळ आपला स्वार्थ साधत आहेत. ते कोणालाही विश्वासात घेत नाहीत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चांगले आहेत. मात्र हे चौघे त्यांच्यापर्यंत पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांना पोहचूच देत नाहीत. हे चौघे त्यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालवतात. त्यामुळे राज्यात सत्ता होती तेव्हाही पक्षाचा विस्तार झाला नाही. आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal elections) भाजपचे तिकिट देतो असे सांगून हे चौघे कामे करून घेत आहेत. त्यांनी कोल्हापुरातून (Kolhapur) पक्ष संपवायची सुपारीच घेतली आहे. अशी आरोप करणारी पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. तसेच, या पोस्टवरुन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत चर्चा होत होत्या.

दरम्यान, गणेशोत्सवामध्ये प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. त्यांनी कोणाच्या घरी जायचे याची यादी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निश्चित केली. या यादीमध्येही काटछाट झाल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला असून आमच्या घरी दादा का आले नाहीत? या वरूनही पक्षात नाराजीच नाट्यकरण सुरु आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

या व्हायरल पोस्टलरुन आता एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने उत्तर दिलं आहे, ते म्हणाले की,
मी गेली 40 वर्षे पक्षाचे काम करत आहे. पक्षात कोणी नाराज नाही.
ज्यांना काही प्रश्न असतील ते पदाधिकाऱ्यांबरोबर थेट बोलू शकतात.
पक्षाचा विस्तार नेहमीच होत राहिला आहे.
पालिका निवडणुकीच्या (Municipal elections) पार्श्वभूमीवर पक्षात नसणाऱ्या काही जणांनी पक्षाची बदनामी करण्याचे षडयंत्र केले असून पक्षाच्या विरोधातील पोस्ट हा त्याचाच एक भाग आहे.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आहे. असं ते म्हणाले.

 

Web Title : BJP Kolhapur | bjp party worker social media post viral video kolhapur

 

हे देखील वाचा :

Supreme Court | ‘एससी’, ‘एसटी’च्या बढत्यांसाठी आरक्षण ! 2018 च्या निर्णयाचा फेरविचार नाही, SC ची स्पष्टोक्ती

Nashik News | आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली ! नाशिकमध्ये डेंग्यू, चिकनगुणियाचा प्रादुर्भाव अधिक; डेंग्यूची रुग्णसंख्या 700

Pune Crime | संतापजनक ! 12 वर्षाच्या मुलाचा 4 वर्षाच्या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार

 

Related Posts