IMPIMP

Ajit Pawar | ‘गणेशोत्सवात पहिल्या दिवशी गर्दी झाल्यास दुसऱ्या दिवसापासून कठोर निर्बंध लावणार’

by nagesh
Omicron Covid Variant Pune | one omicron patient from pune and four patients from pimpri chinchwad were cured ajit pawar says if we will take strong decision

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Ajit Pawar | पुण्यात (Pune) कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी आज (शुक्रवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आले होते. त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर एक इशारा अजित पवार यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात (City of Pune) कुठलेही नवे निर्बंध लावणार नाही. मात्र गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंदाज घेऊन जर गर्दी होते असं लक्षात आल्यास दुसऱ्या दिवसापासून लागलीच कठोर निर्बंध लावण्यात येतील. असं अजित पवार म्हणालेत. त्यावेळी ते मिडियाशी बोलत होते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

अजित पवार म्हणाले, नवीन निर्बंधाबाबत बैठकीच चर्चा झाली. परंतु मोठे मंडळ साधेपणाने गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा करणार असल्याने,
नवीन निर्बंध लादणार नाही. पण नागरीकांनी गर्दी केली तर पहिल्या दिवसाचा अंदाज घेऊन दुसऱ्याचं दिवशी कठोर भूमिका घेण्यात येईल. त्यामुळे तशा
प्रकारची वेळ येवू नये. असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

राज्यात ग्रामीण भागात कोरोना नसल्यासारखं नागरिक वागू लागले आहेत. त्यांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं देखील अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. लसीकरणात महाराष्ट्र अग्रेसर आहे. मात्र, अजून अनेक नागरिकांचे लसीकरण झाले नाही. राज्याकडून जास्तीत जास्त लसीकरण वाढवण्यावर भर दिला जात असल्याचंही पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Ajit Pawar | if there crowd first day ganeshotsav strict restrictions will be imposed second day ajit pawars

 

हे देखील वाचा :

Crime News | बेपत्ता दीर-भावजयीच्या आयुष्याचा धक्कादायक शेवट

SSY | अवघ्या 250 रुपयात उघडा ‘हे’ खाते, मिळतील 15 लाख, जाणून घ्या कसे?

Ajit Pawar | … अन्यथा राज्यात पुन्हा निर्बंध, अजित पवारांचा राज्यातील जनतेला थेट इशारा

 

Related Posts