IMPIMP

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

पाण्यासाठी आदिवासी महिलेला विवस्त्रकरुन मारहाण; सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी- विरोधी पक्षनेत अजित पवार यांची मागणी

by nagesh
 Ajit Pawar | ncp leader ajit pawar mocks shinde fraction gulabrao patil statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | राज्याच्या राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पालघर
जिल्ह्यातील (Palghar District) कोहराळी पाडा (ग्रामपंचायत गंजाड) ता.डहाणू (Dahanu) येथे पाणी भरण्याच्या कारणावरुन महिलेला विवस्त्र करुन
मारहाण (Beating Woman By Stripping Clothes) केल्याची दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई
करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. पाण्यासाठी आदिवसी बांधवांची परवड सुरु आहे, पाण्यासाठी त्यांना अत्याचार
सहन करावे लागत आहेत, तरी आदिवसी पाड्यांवर पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी सुध्दा त्यांनी केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis
Govt)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आपण जागतिक महिला दिन साजरा करण्याच्या दोन दिवस आधी
पालघर जिल्ह्यातील कोहराळी पाडा (ता.डहाणू ) येथे दि.6 मार्च, 2023 रोजी पाण्यासाठी आदिवासी महिलांना विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधित आरोपीला कडक कारवाई करावी. राज्याच्या राजधानी शेजारी असणाऱ्या अदिवासी बांधवांना अशा दुर्दैवी प्रसंगांना वारंवार तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे, हे दुर्दैव आहे. राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची परवड होत आहे, तसेच राजकीय दबावापोटी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला, गुन्हा दाखल करायला सुध्दा विलंब करण्यात आला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीकरुन पिडीत आदिवासी भगिनींना न्याय देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. (Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt)

 

 

Web Title :-   Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | Leader of Opposition Ajit Pawar took the government to task in the case of stripping and beating a tribal woman

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar On Maharashtra Farmers Issue | रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्यावेशीवर; आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत

Ajit Pawar In Vidhansabha | सभागृहातल्या मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे विरोधी पक्षनेते अजित पवार संतापले

Mango Seeds Health Benefits | चुकूनही फेकू नका आंब्याचे बाटे, Cholesterol सारखे 5 गंभीर आजार होतील दूर; जाणून घ्या कसा करावा वापर

Related Posts