IMPIMP

Pandharpur : दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार, अजित पवारांचे व्यापाऱ्यांना आश्वासन

by pranjalishirish
ajit pawar who came pandharpur campaigning got stuck removing veil traders

पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- पंढरपूर पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar  दोन दिवसांच्या पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यामुळे काही सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी नाराज झाले आहेत. त्यामुळे पंढरपूर दौऱ्यावर आलेले अजित पवार हे प्रचार सोडून व्यापाऱ्यांची नाराजी दूर करण्यात अडकले आहे.

माझे मौन हे कुणी कमजोरी समजू नये’, दवेंद्र फडणवीस सरकारवर कडाडले

अजित पवार  Ajit Pawar यांच्या उपस्थिती आज सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यानंतर कल्याणराव काळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व राज्यात कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे याबाबत त्यांनी व्यापाऱ्यांना सूचित केले. परंतु राज्य सरकार व्यापाऱ्यांच्या पाठिशी असून येत्या दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले आहे.

‘खंडणीचे आरोप निराधार, माझी नार्को टेस्ट करा’ ! परब यांचे आव्हान

दरम्यान, अजित पवार Ajit Pawar हे पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी पंढरपूर शहरात जाहीर सभा घेतली. एकिकडे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. गर्दी टाळण्यासाठी विविध कडक निर्बंध सरकारने लागू केले आहेत. मात्र अजित पवारांच्या पंढरपुरातील कार्यक्रमात चक्क कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे पहायला मिळत आहे. या सभेतील नेत्यांच्या व पदाधिकारी यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एक आणि राजकीय नेत्यांना एक न्याय आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Read More : 

Coronavirus : न्यूझीलंडने भारताबाबत घेतला मोठा निर्णय, 28 एप्रिलपर्यंत ‘नो एंट्री’

Chitra Wagh : ‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’

सचिन वाझेंच्या पत्रावरून फडणवीस म्हणाले; ‘पत्र गंभीर…

Chandrakant patil : ‘केंद्रीय आरोग्य मंत्र्यानी ठोक ठोक ठोकलंय’

संभाजी भिडे यांची जीभ घसरली, म्हणाले – ‘कोरोना अस्तित्वात नाही, जे जगायचे ते जगतील अन् मरायचे ते मरतील’

महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचा पुरवठा अधिक, राजेश टोपेंचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

‘महाराष्ट्राला सर्वात जास्त लसी मिळायला हव्यात, मात्र मुद्दाम दिल्या जात नाहीत’, जयंत पाटलांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Related Posts