IMPIMP

‘महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामा देतील’, मोदी सरकारमधील ‘या’ मंत्र्याचे वक्तव्य

by pranjalishirish
All ministers in Maharashtra will resign one by one - union minister ramdas athawle

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ramdas athawle  यांनी मोठं विधान केले आहे. ‘महाराष्ट्रातील सर्व मंत्री एकेक करून राजीनामा देतील’ असे ते म्हणाले.

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. याच मुद्यावर बोलताना आठवले ramdas athawle म्हणाले, की ‘माजी पोलिस आयुक्तांच्या आरोपानंतर देशमुख यांच्या दोन सहाय्यकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे मला वाटते की, अशाप्रकारच्या अजून नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे सरकारमधील सर्व मंत्री राजीनामा देतील आणि शेवटी उद्धव ठाकरेंनाही राजीनामा द्यावा लागेल’.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

दरम्यान, भाजपकडून विविध मुद्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. संजय राठोड, अनिल देशमुख या मंत्र्यानंतर शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर म्हाडाची जागा अनधिकृतपणे बळकावल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच त्यांनी त्यासंदर्भात लोकायुक्तांकडे तक्रारही केली आहे.

Read More : 

देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीवर घणाघात, केला ठाकरे सरकारवर ‘हा’ गंभीर आरोप

पंढरपूर पोटनिवडणूक : ‘तुम्ही पावसात भिजण्यापेक्षा शेतकऱ्यांची जमीन भिजवावी’, सदाभाऊंचा जयंत पाटलांना टोला

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

‘प्राण जाये पर वचन न जाये’, असं उद्धव ठाकरेंचं कार्य’, मुख्यमंत्र्यांची पाठराखण

..हे तर ‘महावसूली’ सरकार अन् ‘जिथं जाऊ तिथं खाऊ’ ही मंत्र्यांची कामे : फडणवीस

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

Related Posts