IMPIMP

‘खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर मृत्यू थांबवता आले असते’

by pranjalishirish
Anger sparked in people after 7 COVID patients death allegedly due to lack of oxygen at a hospital in Nalasopara

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाने गंभीर रुप धारण केले आहे. राज्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. राज्यात काही ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत तर काही ठिकाणी वैद्यकीय साधनसामुग्रीचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच रुग्णांना ऑक्सिनज मिळत नसल्याने मृत्यू Death होत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

रेमडेसीविरसाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने भाजप नेत्याचा नंबर केला शेअर, पोलिसात तक्रार

राज्यात रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू Death होत असल्याचे वृत्त समोर येताच विरोधी पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईतील नालासोपारा येथे काल रात्री ऑक्सिजन अभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकावर टीका केली. आहे. खंडणी वसूल करण्यापेक्षा ऑक्सिजनचा साठा केला असता तर हे मृत्यू थांबवता आले असते, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

प्रसिध्द गायक आनंद शिंदेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले – ‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्याने पडणार नाय’

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ट्विटमध्ये भातखळकर म्हणाले, नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एका तासात सात रुग्णांचा मृत्यू Death झाल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारच्या नकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

Read More : 

बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांवर नियंत्रण आणावं, महाकुंभमेळाव्यातील गर्दीवरून संजय राऊतांचे विधान

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर आमच्या शुभेच्छा’

Lockdown in Maharashtra : लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार – मंत्री अस्लम शेख

Balasaheb Thorat : आज-उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घोषणा करतील, 14 दिवसांच्या Lockdown शिवाय पर्याय नाही

पुणे जिल्हयात कपांऊडर 2 वर्षापासून चालवत होता मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल

Related Posts