IMPIMP

‘आता किमान समान कार्यक्रम म्हणून तिसऱ्या विकेटसाठी काँग्रेसला संधी हवी, अन्याय होऊ नये’, भाजपचा टोला

by pranjalishirish
anil deshmukh opportunity congress after shiv sena ncp third wicket bjp keshav upadhye

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दीड वर्षे झाली. सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरील संकटे कमी होण्याऐवजी वाढत चालली आहेत. सव्वा महिन्याच्या अंतराने मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावरुन भाजपचे नेते आणि प्रवक्ते केशव उपाध्येंनी Keshav Upadhye  महाविकास आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.

शिवसेनेचे धारदार बाण ! म्हणाले – ‘देशातील निवडणूक आयोग ‘मृत’, EC ची भूमिका संशयास्पद’

केशव उपाध्ये  Keshav Upadhye यांनी ट्विट करुन महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रम म्हणून काँग्रेसला देखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये.., असा टोला केशव उपाध्येंनी Keshav Upadhye लगावला आहे.

‘अनिल देशमुख यांना शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी…’

राज्यातील विधानसाभा निवडणुकीत एकत्र लढलेले शिवसेना-भाजप हे निकालानंतर वेगळे झाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले. त्यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन राज्यात सरकार स्थापन केले. त्यावेळी सत्तेचा किमान समान कार्यक्रम ठरविण्यात साधारण एक महिना लागला होता. मागील दोन महिन्यापूर्वी पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर आज 100 कोटी रुपये वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केल्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला आहे. यावरुन भाजपने निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांचे झाले आता काँग्रेसला संधी द्यावी असा टोला भाजपने लगावला आहे.

Also Read :

मोठी बातमी ! अजितदादांना बालेकिल्ल्यातच शह देणार शिवसेना ?

ठाकरे सरकारच्या ‘त्या’ निर्णयाला अखेर भाजपचा पाठिंबा पण…

Hasan Mushrif : ‘फडणवीसांना राज्यसभेत पाठवून त्यांना मंत्रिपद दिलं जाणार, चंद्रकांत पाटील हे नागपुरातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा’

Param Bir Singh : उच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर भाजपकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

‘त्या’ आदेशावरुन काँग्रेसकडून आदित्य ठाकरे ‘निशाण्या’वर, राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी (व्हिडीओ)

Devendra Fadnavis : ‘नैतिकतेच्या आधारावर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार शरद पवारांचा’ (व्हिडीओ)

हफ्ता वसुलीवर चंद्रकांत पाटील म्हणाले – ‘इयत्ता 8 वीचा विद्यार्थीही सांगेल सरकार प्रकरण दाबतंय’

राज्यातील गंभीर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची भूमिका मुख्यमंत्रीपदाला शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा’

PM मोदी, HM शहांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्र्यावर टीका, टीका करताना फडणवीस-पाटलांनी भान ठेवावे, नाहीतर…

Related Posts