IMPIMP

ओवेसींचा योगींवर निशाणा, म्हणाले – ‘उत्तर प्रदेशात एन्काऊंटरमध्ये मारल्या गेलेल्यांपैकी 37 % मुस्लीम’ (व्हिडिओ)

by pranjalishirish
asaduddin owaisi attacks up cm yogi govt over encounter

वाराणसी : वृत्तसंस्था – एमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi  यांनी उत्तर प्रदेशमधील घटनांबद्दल माहिती देत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे झालेल्या एका सभेदरम्यान ओवेसी यांनी भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशातील एन्काउंटरमध्ये मुस्लिमांना निशाणा केलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते म्हणाले, जेव्हापासून भाजपचं सरकार आलं आहे, तेव्हापासून या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2017-2020 का काळात उत्तर प्रदेशात तब्बल 6 हजार एन्काउंटर झाले. यामध्ये मारले गेलेले 37 टक्के मुस्लिम असल्याचा दावा करताना हा अन्याय का केला जातोय, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला आहे.

योगी सरकारकडून संविधानाची पायमल्ली

ओवेसी Asaduddin Owaisi यांनी योगी सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, उत्तर प्रदेशातील योगी सरकारकडून संविधानाची पायमल्ली केली जात आहे. उत्तर प्रदेशात संविधानराज राहिलेले नाही. योगी सरकारच्या अनेक नीती या मुस्लिमविरोधी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशात योगी सरकार बनणार नसल्याचा दावा ओवेसी यांनी केला आहे.

भाजप मंत्र्याचा ओवेसींना सल्ला

ओवेसी Asaduddin Owaisi यांनी योगी सरकारवर आरोप केल्यानंतर योगी सरकारमधील मंत्री मोहसिन राजा यांनी ओवेसी यांच्यावर पलटवार केला आहे. ओवेसी यांनी मुस्लिम बांधवांना बॅरिस्टर होण्याचा सल्ला द्यावा, गुन्हेगार कोणीच बनू नका असा सल्ला त्यांनी आपल्या बांधवांना द्यावा. तसेच गुन्हेगारीमध्ये मुस्लिम बांधवांचे प्रामाण जास्त का असते, याबाबत त्यांनी मुस्लिम समाजाला मार्गदर्शन करावे, असा टोला राजा यांनी लगावला आहे. ओवेसी यांचे पूर्वज देशाचे विभाजन करणारे असून, ओवेसी यांची भूमिका विभाजनवादी असल्याचा आरोप मोहसिन राजा यांनी केला आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी का

Related Posts