IMPIMP

Bacchu Kadu On Navneet Rana | ”नवनीत राणांचा पराभव करणार”, उमेदवारी दिल्याने बच्चू कडू भाजपावर संतापले

by sachinsitapure

अमरावती : Bacchu Kadu On Navneet Rana | युवा स्वाभिमान पार्टीच्या नेत्या नवनीत राणा यांना भाजपाने (BJP) अमरावतीमधून लोकसभेसाठी (Amravati Lok Sabha) उमेदवारी दिली आहे. नवनीत राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाण पत्राचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. लवकरच त्याचा निकाल लागणार आहे, असे असताना राणा यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी अटकळ होती. पण, भाजपाने नवनीत राणा यांना काल उमेदवारी जाहीर केली. त्यांच्या उमेदवारीमुळे त्यांचे कट्टर विरोधक प्रहार पक्षाचे बच्चू कडू हे संतापले आहेत.

नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी भाजपावर संताप व्यक्त केला आहे. तसेच नवनीत राणा यांचा पराभव करण्याचे जाहीर वक्तव्य कडू यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी मान्य नाही. त्यांचा प्रचार मी करणार नाही. तर त्यांचा पराभव करणार. उमेदवारी दिली म्हणजे विजय झाला असे होत नाही. आता तर उमेदवारी जाहीर झाली आहे. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत. आपण सगळं व्यवस्थित करू.

कडू म्हणाले, एकतर दुसरे कुणाला उमेदवारी देऊन त्याला निवडून आणून नवनीत राणा यांना पाडता येते का? किंवा दुसऱ्या एखाद्या सक्षम उमेदवाराला समर्थन देऊन नवनीत राणा यांना पाडता येते का? या गोष्टींचे नियोजन सुरु आहे.

दरम्यान नवनीत राणा तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडूण येतील असा दावा करत नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी बच्चू कडू यांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे. रवी राणा म्हणाले, बच्चू कडू यांनी विरोध व्यक्त केला, त्यांना हात जोडून विनंती करतो की ते सुद्धा एनडीएचा घटक आहेत. सगळे मिळून काम करतील. जिल्ह्याच्या विकासासाठी पाठिंबा द्यावा.

दरम्यान, भाजपाचे लोकसभेसाठी तिकिट मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी काल रात्री भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी नवनीत राणा म्हणाल्या, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस बावनकुळे हे आमच्या पाठीशी आहेत. नवीन माणसाला तिकीट देणारा पक्ष म्हणजे भाजप आहे. आपली सून लक्ष्मीच्या हाती कमळ यावे असे अमरावतीकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण भाजपने पूर्ण केले.

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

Related Posts