IMPIMP

Pune Katraj Crime | पुणे : दुचाकी स्लीप होऊन नर्सरीतील कुंड्या फुटल्याने हत्याराने वार, दोघांना अटक

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Katraj Crime | किरकोळ कारणावरुन मारहाण करुन जखमी करण्याच्या घटना पुणे शहरात वाढत आहेत. कात्रज येथे दुचाकी स्लीप होऊन ती नर्सरीत घुसली. त्यामुळे नर्सरीतील झाडांच्या कुंड्या फुटल्याने दोघांनी दुचाकीस्वाराला शिवीगाळ करुन डोक्यात धारदार हत्याराने मारुन गंभीर जखमी केले. हा प्रकार सोमवारी (दि.25) सायंकाळी सहाच्या सुमारास कात्रज येथील जैन मंदिराकडे (Katraj Jain Mandir) जाणाऱ्या रोडवर घडली.

याबाबत काकासाहेब दत्तात्रय शिंदे (वय-42 रा. वाघजाईनगर रोड, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सुनील बाळकृष्ण चव्हाण Sunil Balkrishna Chavan (वय-50) महेश सुनिल चव्हाण Mahesh Sunil Chavan (वय-27 रा. आनंद दरबार जवळ, दत्तनगर रोड, आंबेगाव खुर्द) यांच्यावर आयपीसी 326, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या बुलेट गाडीवरुन दत्तनगर चौकाकडून जैन मंदिराकडे जात होते. त्यावेळी त्यांची गाडी स्लीप झाल्याने समोर असलेल्या नर्सरीच्या आतमध्ये गेली. त्यामुळे नर्सरी मधील झाडाच्या कुंड्या फुटल्या. याचा राग आल्याने फिर्य़ादी यांच्या तोंडओळखीचे आरोपी यांनी फिर्यादी यांच्यासोबत वाद घातला. तसेच कुंड्या फुटल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. काकासाहेब शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर (PSI Mohan Kalamkar) करीत आहेत.

Shivsena UBT Loksabha Candidates | लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, मावळमधून संजोग वाघेरे, कोण आहेत ‘हे’ 17 उमेदवार?

Related Posts