IMPIMP

UPA चं नेतृत्व शरद पवारांनी करावं?, बाळासाहेब थोरात म्हणाले…

by pranjalishirish
balasaheb thorat gives reaction on chairmanship of upa

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना नेते संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात  Balasaheb Thorat यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

‘मुलींनो, राहुल गांधीपासून सांभाळून राहा, त्यांच्यासमोर वाकून उभे राहू नका’; माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

काय म्हणाले बाळासाहेब थोरात
सोनिया गांधीच युपीएचं नेतृत्व करणार आहेत. काँग्रेस हा एक देशव्यापी पक्ष आहे. काँग्रेस कदाचित अडचणीच्या काळातून जात असेल, मात्र देशाचं नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि राहणार आहे. पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणे योग्य वाटत नाही असे मला वाटते. असे बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat  यांनी स्पष्ट केले आहे.

शरद पवार पंढरपुरात प्रचारासाठी येणार का? जयंत पाटील म्हणाले…

युपीएच्या अध्यक्षपदाच्या चर्चांवरुन बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडी सरकार होण्यात संजय राऊतांचा मोठा सहभाग असल्याचे आम्ही जाहीरपणे सांगतो. पण संजय राऊत एका बाजूला राजकारणी आहेत तर एका बाजूला ते संपादक सुद्धा आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असे वाटते. असेसुद्धा बाळासाहेब थोरात म्हणाले आहे.

‘सचिन वाझेंनी असा काय खुलासा केला की, शरद पवारांच्या अचानक पोटात दुखायला लागलं?’

सध्या आघाडीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे. आम्ही घटकपक्ष आहोत. त्यामुळे तीन पक्ष एकत्र असताना आणि चांगलं काम करत असताना त्यांना बळ देणं त्यांचे काम आहे. अशा वक्तव्यामुळं नाराजी निर्माण होते असेदेखील बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat म्हणाले आहेत.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना टोला, म्हणाले – ‘कदाचित राजकारणी आणि संपादक यात त्यांची गल्लत होते…’

चर्चा तर होणारच ! पार्थ पवारांनी घेतली अजितदादांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट

Related Posts