IMPIMP

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक ! भाजपच्या गडाला मोठं भगदाड, आणखी 5 जण शिवबंधनात

by pranjalishirish
big news : 5-bjp corporators join shiv sena in jalgaon municipal corporation mayoral election

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेने Shiv sena जळगावमध्ये भाजपच्या गडाला खिंडार पडली आहे. भाजपचे ३० नगरसेवक ठाण्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या ५७ नगरसेवकांपैकी ३० नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.

१८ मार्चला जळगावच्या महापालिकेची महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. मात्र या निवडणुकीच्या अगोदरच शिवसेनेने Shiv sena  भाजपचे ३० नगरसेवक आपल्याकडे वळवून भाजपच्या गडाला खिंडार पाडली आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी राज्य भाजपचे संकटमोचक हनुमान म्हणून ज्यांची ओळख आहे असे गिरीष महाजन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भाजपचे संख्याबळ उद्धवस्त केले आहे.

जळगाव महापालिकेचे शिवसेनेने Shiv sena फोडलेले नगरसेवक हे सध्या शिवसेना नेते एकनाथ शिंदे
यांच्या ताब्यात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
या निवडणुकीत गिरीश महाजन यांचा पराभव करून थेट देवेंद्र फडणवीस यांनाच धक्का देण्याची रणनीती
शिवसेनेकडून आखण्यात आली आहे.
या महापालिकेचे महापौर पद सध्या भाजपकडे आहे.
आता नव्या महापौर आणि उपमहापौर यांची निवडणूक असताना भाजपचे काही नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देत सरळ मुंबई गाठली.
या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सुरेश दादा जैन यांची भेट घेतल्याचे समजत आहे.
हे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाल्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग सोप्पा होणार आहे.

Also Read : 

सचिन वाझे प्रकरण : जयंत पाटलांचे भाजपला चोख प्रत्युत्तर, म्हणाले – ‘गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची गरज नाही’

मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Related Posts