IMPIMP

BJP Candidates For Lok Sabha In Maharashtra | भाजपकडून 23 उमेदवार घोषित, ‘या’ 5 विद्यमान खासदारांचा पत्ता कट; विद्यमान खासदारांच्या जागी ‘या’ उमेदवारांची वर्णी

by sachinsitapure

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP Candidates For Lok Sabha In Maharashtra | लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रात आतापर्यंत भाजपकडून त्यांनी 2019 मध्ये जिंकलेल्या 22 आणि चंद्रपूरच्या जागेवर उमेदवार घोषीत केले आहेत. भाजपने देशपातळीवर पाच याद्या जाहीर केल्या आहेत. त्यातली दुसरी आणि पाचवी यादीमध्ये महाराष्ट्रातील 23 उमेदवार आहेत. भाजपने पूनम महाजन यांचे नाव वगळून 23 जागेवर उमेदवार घोषित केले आहेत. उमेदवार घोषीत करताना भाजपने पाच विद्यमान खासदारांचा पत्ता कट केला आहे.

‘या’ पाच खासदारांचा पत्ता कट

भापने 23 उमेदवारी जाहीर करताना 5 विद्यमान खासदारांना घराचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये मुंबईतील दोन जागांचा समावेश आहे. प्रितम मुंडे यांचा पत्ता कट करुन पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने घरचा रस्ता दाखवला आहे. तर सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी हे भाजपचे खासदार आहेत. त्यांच्याऐवजी राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विद्यमान खासदारांच्या जागी ‘या’ उमेदवारांची वर्णी

गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी पिषूष गोयल यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी
मनोज कोटक यांच्या ऐवजी मिहिर कोटेचा यांना उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून उमेदवारी
प्रितम मुंडे यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना बीड मतदारसंघातून उमेदवारी
उन्मेष पाटील यांच्या ऐवजी स्मिता वाघ यांना जळगाव मतदारसंघातून उमेदवारी
जयसिद्धेशवर स्वामी यांच्या ऐवजी राम सातपुते यांना सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी

या जागांवर अजूनही वाद?

जाहीर न केलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, रायगड, धाराशिव, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या जागांवर शिंदेंचा उमेदवार असणार की भाजपचा असणार यावर अजूनही चर्चा सुरुच आहे. या जागांवर शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवार गटातील खासदार आहेत. यामधील शिंदेंच्या खासदारांवर नाराजी असलेल्या जागांवर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. भाजपकडून दावा करण्यात आलेल्या जागांमध्ये अमरावती, परभणी, नाशिक, मुंबईमधील तीन जागा आणि पूनम महाजन यांची जागा तसेच आणि कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या जागेचा समावेश आहे.

आत्तापर्यंत भाजपाचे जाहीर झालेले 23 उमेदवार कोण?

1. चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार
2. रावेर – रक्षा खडसे
3. जालना – रावसाहेब दानवे
4. बीड – पंकजा मुंडे
5. पुणे – मुरलीधर मोहोळ
6. सांगली – संजयकाका पाटील
7. माढा – रणजीत निंबाळकर
8. धुळे – सुभाष भामरे
9. उत्तर मुंबई – पियुष गोयल
10. उत्तर पूर्व मुंबई – मिहीर कोटेचा
11. नांदेड – प्रतापराव चिखलीकर
12. अहमदनगर- सुजय विखे पाटील
13. लातूर- सुधाकर श्रृंगारे14. जळगाव – स्मिता वाघ
15. दिंडोरी – भारती पवार
16. भिवंडी – कपिल पाटील
17. वर्धा – रामदास तडस
18. नागपूर – नितीन गडकरी
19. अकोला – अनुप धोत्रे
20. नंदुरबार – डॉ. हिना गावित
21. सोलापूर – राम सातपुते
22. भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
23. गडचिरोली चिमूर – अशोक नेते

Lok Sabha Election 2024 | पुणे: निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 35 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण

Related Posts