IMPIMP

Chandrakant Patil : ‘अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करून पुण्यात लक्ष द्यायला हवं, झेपत नसेल तर पद सोडावं’

by nagesh
bjp chandrakant patil on maharashtra deputy cm ajit pawar coronavirus covid 19 lockdown

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पुण्यात कोरोना परिस्थिती हाताबाहेर जात असताना पालकमंत्री जिल्ह्याला वेळ देत नाहीत. फोनवरही ते नागरिकांना उपलब्ध होत नाही. अजित पवार यांनी आता त्यांची झोप कमी करुन पुण्यात लक्ष द्यावे. अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज (बुधवार) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.

धनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी, 2003 नंतर पहिल्यांदाच अशी कामगिरी

कोरोना संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे ? असा सवाल चंद्रकांत पाटील Chandrakant Patil यांनी विचारला आहे. कोरोनाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी लोकांचे बाहेर फिरणे, एकमेकांना भेटणं बंद केले पाहिजे. लॉकडाऊनची गरज आहे हे योग्य असलं तरी त्यांनतंर लोकांचे जे हाल होणार आहेत त्याची काळजी करायची की नाही. तुटपुंजे पॅकेज द्यायचं आणि ते देखील अद्याप हातात पडलेले नाही, अशी टीका पाटील यांनी केली.

स्मृती इराणींचा ममता बॅनर्जीवर हल्लाबोल, म्हणाल्या – ‘कोरोनासाठी मोदी-शहांना जबाबदार धरणे यातून ममतांचे संस्कार दिसतात’

पालकमंत्र्याने 24 तास छडी घेऊन बसला पाहिजे
रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची पूर्ण व्यवस्था केल्याशिवाय लॉकडाऊन करुन काय करणार आहात ? पुण्यातील 10 रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना इतरत्र हलवावं लागलं. अजित पवारांनी आता सर्व सोडून पुण्यात येऊन बसले पाहिजे. पालकमंत्र्याने 24 तास हातात छडी घेऊन बसलं पाहिजे. काही पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात 40 हजार रेमडेसिवीर नेत आहेत. आणि पुणे शहराला फक्त 700.. अजित पवार यांच्या प्रतिमेला हे शोभत नाही, असा टोला पाटील यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यातून अजिबात हलू नका असे सांगितले पाहिजे, असेही चंद्रकांत पाटील Chandrakant Patil म्हणाले.

Also Read :

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी केल्याने राष्ट्रवादीतून 2 सदस्यांची हकालपट्टी !

ठाकरे सरकारच्या ‘शिवभोजन थाळी’वर भाजपचा गंभीर आरोप; ‘योजना फक्त दिखाऊ’

एका ओळीचे पत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना 450 रुपये केले परत

Related Posts