IMPIMP

‘महाराष्ट्रात लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही, फडणवीसांचा टोला

by pranjalishirish
bjp-devendra-fadanvis-on-maharashtra-government-over-lockdown

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर आता लॉकडाऊन लागू होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी टीकास्त्र सोडले आहे. ‘आम्ही नेहमी म्हणायचो महाराष्ट्रात लोकशाही आहे. पण आता लोकशाहीऐवजी ‘लॉक’शाही चालू आहे…म्हणजेच लॉकडाऊन’, असे ते म्हणाले.

Nitesh Rane : ‘सरकारने कुठलाही त्रास दिला तर संघर्ष अटळ

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक लॉकडाऊन हाच पर्याय सध्या उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू होणार असे सांगितले जात आहे. त्यावरूनच फडणवीस Devendra Fadnavis यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘कधी लॉक करायचं…कधी अनलॉक करायचं…ठीक आहे तेदेखील आवश्यक असतं. मात्र, आपण जेव्हा अशाप्रकारे लॉकडाऊन करतो, लोकांचा रोजगार जातो तेव्हा किमान त्या लोकांना दिलासा म्हणून आपल्या तिजोरीतून 2 रुपये दिले पाहिजे. सरकारला याचं कुठेही भान दिसत नाही.’

‘महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत जनतेने का मोजावी ?’

दरम्यान, महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने सर्व प्रथम विरोध केला पाहिजे, कारण हा महाराष्ट्राचाही अपमान आहे. जर त्यांना अपमान वाटत नसेल तर त्यांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही. हे राष्ट्र एक आहे आणि ते एक ठेवण्याचा प्रयत्न मला दिसत नाही. प्रशासनाला हाताशी धरुन संकटातही राजकारण केले जात असून याचा निषेध केला पाहिजे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते.

Read More : 

…तर मग रोहित पवारांवर गुन्हा दाखल करणार का ?, भाजपचा सवाल

‘हा’ केंद्र सरकारचा अमानुषपणा आहे, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

पंढरपूर : देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले – ‘…तर माझं नाव बदलून टाका’ (Video)

भिडेंच्या वक्तव्याची चौकशी करुन कारवाई करणार, जयंत पाटलांचा इशारा

जयंत पाटलांनी घेतला संभाजी भिडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार, सर्वत्र जोरदार चर्चा

सचिन वाझे प्रकरणावरुनही उदयनराजे आक्रमक, म्हणाले, ‘हा कोण वाझे…’

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

Related Posts