IMPIMP

शिवसेनेच्या नेत्यांच्या सहभागाची सचिन वाझेंनी NIA ला दिली कबुली, भाजपचा दावा

by pranjalishirish
bjp-has-raised-question-which-shiv-sena-leaders-sachin-vaze-mentioned-inquiry

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन टीम – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या चौकशीतून नवनवीन माहिती समोर येत आहे. वांझेना अटक झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे Sachin Vaje यांना सरकारने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. तपासादरम्यान एनआयएला अनेक पुरावे मिळाले आहेत. आणखी बरीच माहिती समोर येईलच असे त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, चौकशी दरम्यान वाझेंनी शिवसेना नेत्यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याची कबुली एनआयएला दिल्याचा दावा भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर करण्यात आला आहे.

एनआयएने साची वाझे Sachin Vaje यांना अटक केल्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी स्फोटके प्रकरणी मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची एनआयएने कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी केली.

सचिन वाझेंनी Sachin Vaje चौकशीत कुठल्या शिवसेना नेत्यांची नावं घेतली, असा भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटरवर सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच मी तर यातला छोटासा हिस्सा आहे. यामध्ये काही शिवसेनेच्या नेत्यांचा सहभाग असल्याची कबुली सचिन वाझेंनी एनआयएकडे दिल्याचा दावादेखील भाजपाने केला आहे. या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

एनआयएकडून अंबानींच्या घराजवळ कार ठेवण्यामागचा उद्देश काय होता याचा तपास सुरु आहे. वाझे स्वतःच्या हिमतीवर इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त सल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्याअनुषन्गानेही तपास सुरु केला आहे. वाझेंचा शिवसेनेशी संबंध नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर, दुसरीकडे एनआयए तपासातून आणखी कोणत्या धक्कादायक बाबी बाहेर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच
सीसीटीव्ही फुटेजमध्ये अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा दिसत होती. त्या गाडीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आता या गाडीची ओळख पटली आहे. क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची ही गाडी असल्याचे स्पष्ट झाले आहे.रविवारी ती गाडी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली.

हत्येचाही गुन्हा दाखल करणार
सचिन वाझे यांच्यावर ज्वालाग्राही पदार्थ बाळगणे, घातपाताचा कट रचणे आदी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या गुन्ह्याची कलमे लवकरच लावली जातील, असे सुत्रांनी सांगितले.

गुन्ह्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर
या गंभीर प्रकरणामध्ये शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. वाझेंनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी, कर्मचारी, पोलीस वाहने आणि अन्य यंत्रणेचा सर्रास वापर केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे करणे शक्य नसल्याचे पोलीस वर्तुळातून सांगण्यात येते.

सचिन वाझेंवर दाखल करण्यात आलेली कलमे –
कलम २८६ : जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणे
कलम ४६५ : खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे
कलम ४७३ : दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती
कलम ५०६(२) : दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणे
कलम १२० ब : गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्‌यंत्रात सहभाग घेणे
स्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचा यात समावेश आहे.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी कामिनी पाटील

Related Posts