IMPIMP

फडणवीसांचा CM ठाकरेंना टोला, म्हणाले – ‘राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास; मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

by pranjalishirish
Devendra Fadnavis | former cm devendra fadnavis warning thackeray government during inspection of heavy rains

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वाढता कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि 2 एप्रिल) राज्यातील जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊन हा उपाय नाही, पण त्याला पर्याय हवा. विविध तज्ज्ञ, राजकीय नेते आणि सर्व संबंधितांशी चर्चा करणार असून पर्यायी मार्ग न सापडल्यास लॉकडाऊन करावा लागेल असा इशारा त्यांनी दिला. यानंतर आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरादर टीका केली आहे. संपूर्ण कोरोना परिस्थितीत कोणतं राज्य आपल्याच जनतेला त्रास देत असेल, तर ते महाराष्ट्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कशासाठी भाषण केलं हेच समजलं नाही असा टोला त्यांनी लागवला आहे. नागपूरमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी यासंदर्भात भाष्य केलं.

शिवसेनेकडून भाजपला टोला, म्हणाले – ‘किमान, व्याजदर कपातीचा दांडपट्टा तरी चालवू नका

‘महाराष्ट्रानं एका पैशाचंही पॅकेज दिलं नाही, उलट लोकांचं वीज कनेक्शन कापणं, त्यांना त्रास देणं यावरच भर दिला’

देवेंद्र फडणवीस  Devendra Fadnavis म्हणाले, कोरोनाच्या काळात केंद्र सरकारनं 20 कोटींचं पॅकेज गेल्या वर्षभरात दिलं. देशातील इतर राज्यांनीही जनतेसाठी पॅकेज दिलं. केवळ महाराष्ट्रानं एका पैशाचंही पॅकेज दिलं नाही. त्याऐवजी लोकांचं वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं यावरच भर दिला अशी टीका फडणवीस यांनी केली.

अनेक ख्यातनाम विचारवंताचे गृहमंत्री अनिल देशमुखांना पाठबळ, म्हणाले…

‘मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही’

पुढं बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी केलेल्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही की, उपाययोजना सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांनी भाषण कशासाठी केलं तेच समजलं नाही. राज्यात अनेक ठिकाणी बेड उपलब्ध नहाीत. ते का मिळत नाहीत. त्यावर काय करणार आहोत, उपाययोजना काय, व्यवस्था का नाही, याचं उत्तर द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देतात त्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला अशा खोचक शब्दात त्यांनी सीएम ठाकरेंवर निशाणा साधला.

Lockdown बाबत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान, म्हणाले – ‘सरकारला आमची विनंती राहील की…’

‘2 दिवसात काय होणार आहे ? मुख्यमंत्र्यांनीही मोदींप्रमाणे तेच करायला हवं’

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसाठी जो अल्टीमेटम दिला त्यावरही देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis  यांनी भाष्य करत टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात की, 2 दिवसात बघा. काय दोन दिवसात बघायचंय. लॉकडाऊन अपवादात्मक परिस्थितीत करावा लागतो. तो अपवाद आहे, नियम होऊ शकत नाही. लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणारं अन्नधान्य, खात्यावर जाणारे पैसे, अन्य सुविधा यांचा विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही असंही फडणवीसांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.

Also Read : 

दुर्दैवी ! ‘कोरोना’मध्ये उत्कृष्ट कार्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून नुकतेच सन्मानित झालेले जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कठोर निर्बंध लावणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

पत्नी रूग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, टिका करणं सोपं पण…’

जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मोदी सरकारच्या निर्णयावर शिवसेनेची टीका; म्हणाले – ‘हा तर धक्कादायक विनोद !’

Photos : ‘ही’ Hot मॉडेल लढवणार जौनपूर पंचायत निवडणूक !

Related Posts