IMPIMP

‘POK वर ताबा मिळवणे विसरून जा’; स्वामींचा भाजपला ‘घरचा आहेर’

by pranjalishirish
bjp leader subramanian swamy says now forget getting pok and liberating balochistan

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्यावरून भाजपच्याच एका ज्येष्ठ खासदाराने घरचा आहेर दिला आहे. ‘पाकव्याप्त काश्मीरवर (POK) ताबा मिळवणे व बलुचिस्तान स्वतंत्र करणे आता विसरून जा’, असे वक्तव्य भाजपचे खासदार सुब्रमण्यम् स्वामी  Subramanian Swamy यांनी केले आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून, तो पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर स्वामी यांनी भाष्य केले.

‘संसाधने तसेच लस उपलब्ध आहे, मग लॉकडाऊन का ?’, मनसेचा Lockdown ला विरोध, ठाकरे सरकारवर साधला ‘निशाणा’

सतत काहीना काही वादग्रस्त वक्तव्य करून सुब्रमण्यम् स्वामी Subramanian Swamy  नेहमी चर्चेत असतात. आता त्यांनी पाकव्याप्त काश्मीरवर भाष्य केले. एका ट्विट युजरने एका मीडिया रिपोर्टचा संदर्भ देत खासदार स्वामींना टॅग केले होते. त्यामध्ये त्याने भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या संबंधांवर समाधानी आहात का, असा सवाल उपस्थित केला. त्यावर स्वामी यांनी म्हटले, की ‘पाकव्याप्त काश्मीरवर ताबा मिळवणे आणि बलुचिस्तान स्वतंत्र करणे हे आता विसरून गेले पाहिजे’.

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

दरम्यान, जम्मू-काश्मीरातील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर भारत पाकव्याप्त काश्मीरकडे वळवणार अशा जोरदार चर्चा सुरु होत्या. तसेच पाकव्याप्त काश्मीर हा भारतातच भाग आहे. तो पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता खासदार स्वामी  Subramanian Swamy यांनी वक्तव्य करत भाजपलाच घरचा आहेर दिला आहे.

Also Read:

केंद्राने गोठवला खासदारांचा निधी, खासदारांचा आता राज्याच्या निधीवर ‘डोळा’

सचिन, पठाण बंधू यांच्यानंतर भारतीय टीमच्या ‘या’ कर्णधाराला कोरोनाची लागण

अमित शाह-शरद पवार यांच्या भेटीवर काँग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

संजय राठोड, अनिल देशमुख यांच्यानंतर आता ‘हे’ मंत्री येणार अडचणीत; थेट लोकायुक्तांकडेच तक्रार

Lockdown ला राष्ट्रवादीचा विरोध, मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं ‘लॉकडाऊन राज्याला आणि जनतेला परवडणारा नाही’

‘कोरोनाच्या सेकंड म्युटंटप्रमाणेच गुन्हेगारीचं रूपही बदलतंय’ : CM उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांबाबत केलं महत्वपूर्ण विधान; म्हणाले, ‘…भानावर राहावेच लागेल’

शिवसेनेने केली वेगळीच मागणी, ‘मोदींसारख्या सैनिकांना ताम्रपट मिळायला हवे’

Sachin Vaze : ‘काल पर्यंत सचिन वाझे प्रामाणिक व कार्यक्षम अधिकारी म्हणणाऱ्या संजय राऊतांचा यू-टर्न, NIA ने चौकशी करावी’

Related Posts