IMPIMP

‘…हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार’ : अतुल भातखळकर

by bali123
bjp mla atul bhatkhalkar criticize thackeray government issue sharjil usmani

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने एल्गार परिषदेत हिंदूविरोधात भाषण केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. भाजपने शरजील याच्यावर कारवाईसाठी ठाकरे सरकारवर दबाव टाकला जात आहे. त्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर atul bhatkhalkar यांनी ‘हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार,’ अशा शब्दांत टीका केली.

शरजील उस्मानी याने पुण्यातील एल्गार परिषदेत हिंदूविरोधी वक्तव्य केले होते. त्याबाबत जबाब नोंदवण्यासाठी पुण्यात आला होता. मात्र, त्याची गुप्तता पाळली गेली. त्यावरून अतुल भातखळकर atul bhatkhalkar यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. या संदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले, की ‘शरजील उस्मानी हा ठाकरे सरकारचा जावई आहे हे काल पुन्हा सिद्ध झाले. एल्गार परिषदेत केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्याबाबत पोलिसांकडे जबाब नोंदवण्यासाठी तो पुण्यात आला आणि गुपचूप निघून गेला. सरकारने इतकी गोपनीयता पाळली की या कानाचे त्या कानाला कळले नाही. हे तर दाढ्या कुरवळणारे सरकार आहे’.

काय म्हणाला होता उस्मानी?
हिंदुस्तानात हिंदू समाज सडला आहे. जुनैदला धावत्या ट्रेनमधून मारले जाते. त्याला कोणी वाचवायला येत नाही. हे लोक लिंचिंग करतात, खून करतात. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या कोणाला पकडतात. त्यानंतर त्याचाही खून करतात आणि सामान्य जीवन जगतात.

उस्मानीचेही स्पष्टीकरण
आपल्यावरील गुन्हा तथ्यहीन आहे. माझ्या भाषणातील काही विधाने संदर्भ न देता उचलण्यात आली आहेत. मी भाषणात सध्याच्या परिस्थितीवर बोललो आहे आणि त्यावर उपाय सांगितला आहे. लोकांना समस्या समजावी म्हणून काही कठोर शब्द वापरले आहेत.

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Related Posts