IMPIMP

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

by bali123
bjp mla gopichand padalkar give 7 days allowance to needy MPSC students

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी पुण्यात रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होऊन अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांच्यासह इतरांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज राज्य सरकारने एमपीएसीची परीक्षा 21 मार्च रोजी घेण्याचे जाहीर केले. यानंतर पडळकर यांनी 21 तारखेला परीक्षा झाली नाही, तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. तसेच गरजू मुलांना सात दिवसांचा भत्ता द्या, अशी मागणी केली आहे.

पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, ठाकरे सरकार विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळत आहे. हे सरकार विश्वासघाताने सत्तेत आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. माझ्यासोबत आंदोलक हे लादेन समर्थक होते का? असा सवाल उपस्थित करत 21 तारखेला परीक्षा झाली नाही, तर पुन्हा एकदा आंदोलन करणार आहे. मात्र, हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासमोर करणार असल्याचा इशारा पडळकर यांनी दिला आहे. तसेच मुलांना सात दिवसांचा भत्ता द्या, अशी मागणी त्यांनी केली.

गुरुवारी राज्य सरकारने एमपीएससीची 14 मार्च रोजी होणारी पूर्वपरीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुण्यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी शास्त्री रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या अघोषित आंदोलनाचे नेते बनलेले आमदार गोपीचंद पडळकर gopichand padalkar यांच्यासह 20-25 जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात आंदोलन सुरू झाल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनस्थळी आले होते.

चंद्रकांत पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट; केली ‘ही’ मागणी

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts