IMPIMP

MPSC Exam Postpond : अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत; म्हणाले – ‘MPSC प्रकरण हाताळण्यात कमी पडलं’

by bali123
maharashtra deptuty cm ajit pawar pune coronavirus lockdown mpsc

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्य लोकसेवा आयोगाची ( MPSC ) राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर पुण्यातील लॉकडाउनसंदर्भात पत्रकारांशी बोलताना त्यांनी एमपीएससीच्या प्रश्नावर मौन सोडले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एमपीएससी प्रकरण हातळण्यात कमी पडलं, असं स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले. तसेच या प्रकरणावर राजकारण करणे योग्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी पुण्यात लॉकडाउन होणार नसल्याचे स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येवर केंद्र सरकारनेदेखील चिंता व्यक्त केली होती. पुण्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये अजित पवार कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पुण्यात लॉकडाउन होणार नसल्याचे सांगून काही बंधने घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

पत्रकारांशी बोलताना एमपीएससीच्या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, एमपीएससीच्या परीक्षांबाबत विनाकारण राजकारण तापवण्याचं काम करण्यात आलं. मात्र, आता सुधारित वेळापत्रक आयोगाने जारी केले आहे. त्यानुसार परीक्षा होतीलच. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात स्वत:हून लक्ष घातलं आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याबाबत माझं स्पष्ट मत आहे की, हे प्रकरण हातळण्यात एमपीएससी कमी पडले आहे. एमपीएससी स्वायत्ता संस्था असली तरी त्यांनी विद्यार्थ्यांना अडचणीत आणणारे निर्णय घेऊ नयेत, असे खडेबोल एमपीएससीला सुनावले.

21 तारखेला परीक्षा न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार; गोपीचंद पडळकरांचा राज्य सरकारला इशारा

Mukesh Ambani Bomb Scare : तिहार जेलमधील दहशतवादी तहसीन अख्तरकडून मोबाईल हस्तगत

वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेंची नागरी सुविधा केंद्रात बदली

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी ATS चे ‘क्राइम सीन’ प्रात्याक्षिक

Related Posts