IMPIMP

भाजपचे संकटमोचक आमदार गिरीश महाजन यांना ‘कोरोना’ची लागण

by pranjalishirish
bjp mla girish mahajan become corona positive

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे माजी जलसंपदा मंत्री आणि आमदार गिरीश महाजन Girish Mahajan यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, जळगाव महापालिकेतील नगरसेवक शिवसेनेत गेल्याने भाजपसमोर अडचण निर्माण झाली असतानाच महाजन कोरोना पॉझिटिव्ह आल्याने भाजपच्या अडचणीत दुहेरी वाढ झाली आहे.

गिरीश महाजन Girish Mahajan यांना मागील काही दिवसांपासून कोरोनासारखी लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी करून घेतली. चाचणी अहवालामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यांच्यावर जामनेर येथे उपचार सुरु असून तेथे ते क्वारंटाईन झाले आहेत. काही दिवसांपूर्वी महाजन यांच्या पत्नी आणि जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन आणि त्यांच्या कन्या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.

जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी (दि.18) निवडणूक होत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपचे 27 नगरसेवक शिवसेनेच्या गोटात सामिल झाले आहेत.
त्यामुळे भाजप नेते व संकटमोचक गिरीश महाजन Girish Mahajan महापालिका राजकारणातले डॅमेज
कंट्रोल करण्यात व्यस्त असताना त्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने भाजप समोरील संकट गडद झाले आहे.
दरम्यान, गिरीश महाजन सर्व घडामोडींचा आढावा फोनवर घेत आहेत.

Also Read :

भाजप खासदाराचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्या केल्याचा संशय

भाजपचे नगरसेवक संजय भोपी यांचे ‘कोरोना’मुळे निधन

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : ‘त्या’ मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो

पुन्हा परतला पाकिस्तानचा चांद नवाब ! यावेळी, राष्ट्रपतींच्या मुलाखतीसह धमाल, Video व्हायरल

Related Posts