IMPIMP

नाशिक महापालिका : ‘शिवसेना-राष्ट्रवादी’चा गेम फेल; भाजपकडेच तिजोरीच्या चाव्या !

by amol
bjp win in nashik municipal corporation standing committee elections shiv sena and ncp lose

सरकारसत्ता ऑनलाइन – भाजपला (Bharatiya Janata Party – BJP) नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) सत्ता पुन्हा एकदा राखण्यात यश आलं आहे. सातत्यानं स्थायी ताब्यात घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला (ShivSena) मात्र आता चांगलंच बॅकफुटवर जायला लागल्याचं दिसत आहे. यानंतर आता सेनेसोबत असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीलाही माघार घ्यावी लागली आहे.

विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, आपापसातील एकोप्याअभावी नाशिक महापालिकेची Nashik Municipal Corporation स्थायी समिती ताब्यात ठेवण्यात सत्ताधारी भाजपला यश आलं आहे. दरम्यान, या निवडणुकीरून गेल्या काही दिवसांपासून पालिकेचं राजकारण चांगलंच तापलं होतं. प्रत्येक राजकीय पक्ष स्वबळाची भाषा करत होता. पालकमंत्री छगन भुजबळ यांना तर कोणत्याही परिस्थितीत पालिका Nashik Municipal Corporation राष्ट्रवादीच्या ताब्यात आणायची होती. शिवसेना अत्यंत आक्रमक हालचाली करताना दिसली होती.

भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागूल या 2 बड्या नेत्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश, खासदार संजय राऊत यांचे सातत्यानं होणारे दौरे आणि याच पार्श्वभूमीवर आलेली स्थायीची निवडणूक. महाविकास आघाडी पॅटर्न राबवून स्थायी ताब्यात घेण्यासाठी सेनेनं रणनीती तर आखली. मात्र, मनसेला तंबूत घेण्यात त्यांना अपयश आलं. छगन भुजबळ यांचा करिश्माही अपयशी ठरला. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी केलेल्या वेगवान हालचाली, जमवून घेण्याची हातोटी ही सर्वच विरोधकांना चक्रावून टाकणारी ठरली.

भाजपला अखेर पुन्हा एकदा स्थायी समिती अत्यंत महत्त्वाच्या कालावधीसाठी ताब्यात राखण्यात यश आलं आणि मनसे-भाजप हा नवा पॅटर्न चक्क खुल्या पद्धतीनं समोर आला. अर्थात ही निवडणूक येत्या पंचवार्षिक निवडणुकीची नांदी मानली जात आहे. अखेर सभापतिपदी भाजपचे गणेश गीते यांची अपेक्षेप्रमाणे बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्यानं, त्यांची बिनविरोध निवड ही निश्चितच होती.

सतत स्थायी समिती ताब्यात घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेनं तर याकडे चक्क पाठच फिरवली. शिवसेनेचे 5 सदस्य सभागृहात आलेच नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसंच भाजपला समर्थन करणाऱ्या मनसेचे सदस्य मात्र उपस्थित असल्याचं दिसून आलं. या पदासाठी गीते यांचा एकमेव अर्ज असल्यानं अखेर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी गीते यांची निवड झाल्याचं घोषित केलं. स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य असून, मनसेनं भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळं अडचण नव्हती. शिवसेनेनं सुरुवातीला प्रतिष्ठेचा प्रश्न केला. परंतु अन्य विरोधकांनी साथ दिली नाही असं दिसलं.

अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पार्थ पवारांचे ट्विट, म्हणाले…

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गूढ वाढले, इनोव्हाबाबत नवीन माहिती समोर

Maratha Reservation : ‘अशोक चव्हाणांना मराठा आरक्षणांचं काहीही देणं-घेणं नाही’ : देवेंद्र फडणवीस

राजकारणातील प्रवेशाबाबत सौरव गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला…

Related Posts