IMPIMP

शिवसेनेचा मोदी सरकावर हल्लाबोल, म्हणाले – ‘लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून महाराष्ट्राला छळण्याचा केंद्राचा डाव’

by pranjalishirish
central government harass maharashtra creating artificial shortage corona vaccine shivsena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन- राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे Corona संकट अधिक गडद होत आहे. असे असताना महाराष्ट्रात कोरोना लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला. यामागे महाराष्ट्राला छळण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत लसीचे राजकारण सुरू झाले ते निर्घृण असल्याचा आरोप शिवेसनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केला आहे. महाराष्ट्राच्या 2 कोटी जनतेने कधीतरी आजच्या विरोधी पक्षालाही सत्तेवर बसवलेच होते. तेवढे तरी इमान राखा. लस जनतेसाठी आहे. फालतूच्या राजकारणासाठी नाही. जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना संभाजी भिडेंच्या भाषेत गांडूच म्हणावे लागेल असा निशाणाही सेनेने भाजपा नेत्यांवर साधला आहे.

संजय राऊतांनी फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाले – ‘प्रसंग बाका, सरकार कोणाचं हे पाहू नका, दिल्लीतून महाराष्ट्राला मदत मिळवून द्या’

राज्यात कोरोनाने Corona थैमान घातले आहे. पण त्यामागचे राजकारण हे जणू तांडवच करू लागले आहे. माणसे सरणावर चढत आहेत आणि त्यांच्या मढय़ांवरून वादावादी सुरू आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. कोरोना हा मानवनिर्मित की दैवी कोप? यावर बरेच वाद झाले, पण सांगलीचे शिवभक्त अवलिया भिडे गुरुजी यांनी वेगळाच सिद्धांत मांडला. जे गांडू आहेत त्याना कोरोना होणारच. कोरोनामुळे जे मरणार आहेत ती माणसे जगायच्याच लायकीची नाहीत, असा विचार सांगलीच्या अवलियाने मांडल्यामुळे बहुधा लसनिर्मिती करणा-या कंपन्यांनी स्वतःचे उद्योग गुंडाळायला घेतले असतील. देशात कोरोना अनेक भल्याभल्यांना झाला. म्हणजे जे मेले ते मरायच्याच लायकीचे व ज्यांना कोरोना झाला ते गांडू, भिडे गुरुजीही संघ विचाराचे कडवट प्रचारक आहेत. ते छत्रपतींचे भक्त आहेत. मास्क वैगरे लावू नका असे विचारही त्यांनी मांडले. आता देशाचे पंतप्रधान काय करणार?

15 लाखांची लाच घेताना आयकर विभागातील 2 अधिकारी CBI च्या जाळ्यात

पूर्वी महाराष्ट्राचे दिल्लीतील नेते पक्षीय मतभेद विसरून संकटकाळी महाराष्ट्राला कशी मदत होईल यासाठी एकत्र येऊन आकाशपाताळ एक करीत. आज चित्र बदलले आहे. पुण्याचे प्रकाश जावडेकर हे दिल्लीत बसून महाराष्ट्राविरोधी बदनामी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. कोरोना संकटाची लढाई पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. पंतप्रधानांनी कोरोनासंदर्भात Corona जे जे निर्णय घेतले त्याचीच अंमलबजावणी महाराष्ट्राने केली आहे. अर्थात जावडेकर यांचा दोष नसून महाराष्ट्रद्वेष हा दिल्लीतील प्रत्येक राज्यकर्त्यांच्या रक्तातच ठासून भरला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी तर महाराष्ट्राची लसी च्या बाबतीत न्याय मागणी लाथाडण्याचाच प्रयत्न केला.

Balasaheb Thorat : ‘राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या आरोपांना महत्व देत नाही’

केंद्राकडून लस पुरवठ्याबाबत पक्षपातीपणा केला जात आहे. भाजपशासित राज्यांना जास्तीत जास्त लस पुरवला गेला आहे. उत्तर प्रदेशला 44 लाख डोस, मध्य प्रदेशला 33 लाख डोस, गुजरातला 16 लाख, कर्नाटक 23 लाख, हरयाणा 24 लाख, झारखंड 20 लाख आणि महाराष्ट्राच्या वाटय़ाला कसेबसे 17 लाख डोस आले. महाराष्ट्राची लोकसंख्या व कोरोना संक्रमणाची तीव्रता सगळय़ात जास्त असताना केंद्राने हे असे पक्षपाती वागणे माणुसकीला धरून नाही. महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ घडवता येत नसल्याने लसीचा कृत्रिम तुटवडा निर्माण केले जात आहे. राज्यातील लसीकरण ठप्प होईल अशी चिंताजनक परिस्थिती आहे. असे असताना विरोधी पक्षाने अधिक गांभीर्याने वागण्याची अपेक्षा आहे. याच जनतेने भाजपचे 105 आमदार निवडून दिले आहेत. महाराष्ट्राला दर महिन्याला 1.6 कोटी तर आठवडय़ाला 40 लाख लसींच्या डोसची गरज आहे. गुजरातची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा अर्धी, पण गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसी मिळूनही तेथील परिस्थिती महाराष्ट्रापेक्षा अतिगंभीर बनल्याचे निरीक्षण गुजरात हायकोर्टाने केले. महाराष्ट्राचे मॉडेल वापरा असे गुजरात हायकोर्टाने तेथील सरकारला बजावले आहे.

Read More : 

राज्यात 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण Lockdown ? मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर होऊ शकतो निर्णय

खा. विनायक राऊतांचा राणेंवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘कोकण सम्राटां’ नी चिपी विमानतळाचं कंत्राट दळभद्री कंपनीला देऊन वाट लावली

शिवसेनेकडून डॉ. हर्षवर्धन, जावडेकर अन् महाराष्ट्र भाजपचा समाचार, म्हणाले – ‘जे असे राजकारणाची वळवळ करीत आहेत त्यांना भिडेंच्या भाषेत…’

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी रूग्णालयात दाखल

मोहन भागवतांना कोरोना झाल्यानंतर अमोल मिटकरी म्हणाले – ‘आता भिडे गुरुजींना विचारा’

रेमेडिसिवीर इंजेक्शनची वितरण व्यवस्था अन्न व औषध प्रशासनाकडे सोपवावी, खा.डॉ.अमोल कोल्हे यांची राज्य सरकारकडे मागणी

Related Posts