IMPIMP

Vikram Gokhale | ‘त्या’ मुलीची अन् माझी ओळख नाही, पण…’ – विक्रम गोखले

by nagesh
vikram-gokhale-i-dont-know-actress-kangana-ranaut-actor-vikram-gokhale-reiterated-about-independence-statement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Vikram Gokhale | अभिनेते विक्रम गोखले यांनी नुकतंच पुण्यामध्ये (Pune) एका कार्यक्रमादरम्यान राजकीय भूमिकांवर भाष्य केलं. यानंतर त्यांनी कंगना राणावतच्या (Kangana Ranaut) वक्तव्याचं समर्थन केलं होतं. यानंतर समाज माध्यमांवर गोखले यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. या टीकेवरुनच विक्रम गोखलेंनी (Vikram Gokhale) आज (शुक्रवारी) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

काय म्हणाले विक्रम गोखले?

यावेळी बोलताना विक्रम गोखले (Vikram Gokhale) म्हणाले, ‘कंगना राणावत या मुलीने गेल्या दोन वर्षात जी काही भाष्य केली आहेत, ती तिची
वैयक्तिक मतं आहेत. भारतीय स्वातंत्र्याबद्दल तिने केलेल्या वक्तव्याला तिची स्वतःची काही कारणं असू शकतात. मात्र, मी तिच्या म्हणण्याला दुजोरा
दिला यात माझीही काही कारणं असू शकतात, ती समजून न घेताच याबाबत धुरळा उडवायला सुरुवात झाल्याचं गोखले यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे,
त्या मुलीची आणि माझी ओळख नाही. आम्ही कधी एकत्र कामही केलेलं नाही. परंतु, तरीही कुणीतरी काहीतरी बोलतंय त्याची दखल घेणं, आपलं मत
असेल आणि आवश्यकता असेल तर ते मत व्यक्त करणं हा अधिकार आहे. असं गोखले म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुढे ते म्हणाले, ‘माझी तिच्याशी ओळख नसली, तरी माझ्या राजकीय अभ्यासाशी चांगली ओळख आहे. मी जो दुजोरा दिला, त्यामागे माझीही काही
कारणं आहेत, आता ती सांगत बसत नाही. पण, 18 मे 2014 रोजीचा गार्डियनचा अंक आहे. जे गार्डियनने म्हटलंय, तेच कंगनाने म्हटलंय, त्याची कॉपीही
माझ्याकडे आहे. त्यामुळे कंगना काहीही चुकीची बोलली नाही असं मी म्हणालो.. ताबडतोब बोंबाबोंब… सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीय नागरिक म्हणून आणि राजकीय अभ्यासक म्हणून हा माझा अभ्यास आहे. सन 2014 पासून माझ्यासारख्या सामान्य भारतीयाला खरं
स्वातंत्र्य मिळालं, हे माझं प्रामाणिक मत असून ते मी मुळीच बदलणार नाही. ज्यांना मी काय बोललोय माझ्या मूळ भाषणात, जे तुम्ही दाखवलंच नाही,
अश्रू ढाळणारे स्वातंत्र्यसैनिक ज्यांचे शिव्या शाप मला मिळताहेत, त्यांना कळेल विक्रम गोखले काय बोलले आणि काय दाखवलं. मी कोणत्याही
स्वातंत्र्यसैनिकाचा अपमान केलेला नाही, असं ते म्हणाले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी मी मोदींना विनंती करणार’ – चंद्रकांत पाटील

Satej Patil Net Worth | कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता; 16 कोटी 53 लाखांचे कर्ज

Nawab Malik | PM मोदींनी 3 कृषी कायदे मागे घेतल्यानंतर नवाब मलिकांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘निवडणुकांतील पराभवाच्या भितीनं…’

 

Related Posts