IMPIMP

संभाजीनगरबाबत अद्याप केंद्राला प्रस्ताव पाठवलेला नाही, CM ठाकरेंची कबुली

by pranjalishirish
cm-uddhav-thackeray-admitted-no-proposal-sambhajinagar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर करू, असे आश्वासन शिवसेना मागील अनेक वर्षांपासून देत आहे. शिवसेनेचे नेतेदेखील औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करतात. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray मुख्यमंत्री होऊन दोन वर्षे झाली तरी या नामांतराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतराबाबतचा प्रस्ताव अजून केंद्राला पाठवलेला नाही, अशी कबुली मंगळवारी (दि. 9) विधानसभेत दिली.

विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी दिलेल्या लेखी उत्तरातून ही गोष्ट समोर आली आहे. भाजपचे आमदार सागर योगेश यांनी औरंगाबादच्या नामांतराच्या संदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांकडून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावं, असा प्रस्ताव 4 मार्च 2020 रोजी राज्य शासनाला मिळाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray  यांना उत्तरात नमूद केलं आहे.

दरम्यान, 1995 मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर सरकारने अधिसूचना काढून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचे जाहीर केले होते. मात्र, औरंगाबादमधील नगरसेवक महंमद मुश्ताक यांनी उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. 17 नोव्हेंबर1996 रोजी सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश दिला होता.

Also Read :

‘मुंबई पोलिसांचे, थोबाड काळे झाले’, पोलिसांबद्दल फडणवीस असं कसं बोलू शकतात ?

नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले – ‘ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून वाझेंना टार्गेट’

Related Posts