IMPIMP

‘निवडणुकीमुळं रजनीकांत यांना पुरस्कार दिलाय का?’ मंत्री जावडेकर संतापले, म्हणाले- पत्रकारांनी…

by pranjalishirish
dadasaheb phalke award rajinikanth prakash javadekar slams to journalist

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार गुरुवारी (1 एप्रिल) जाहीर झाला. पुरस्काराची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर Prakash Javadekar  यांनी पत्रकार परिषदेत केली. या घोषणेनंतर तामिळनाडूमधील आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांना हा पुरस्कार दिला आहे का, असा प्रश्न जावडेकर यांना पत्रकारांनी विचारला. यावर प्रकाश जावडेकर चांगलेच भडकले आणि प्रश्न नीट विचारत जा असे सुनावले. चित्रपट सृष्टीमध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अभिनेते रजनिकांत यांना जाहीर झाला आहे.

वडिल राजेंद्र पवारांना ‘कृषीरत्न’ जाहीर होताच पुत्र आमदार रोहित यांचे ‘हे’ ट्विट चर्चेत

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जावडेकर  Prakash Javadekar म्हणाले, हा पुरस्कार सिनेसृष्टीशी संबंधित आहे. पाच जणांच्या निवड समितीने एकमताने रजनीकांत यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये राजकारण कोठून आले ? प्रश्न नीट विचारले पाहिजेत असे जावडेकर  Prakash Javadekar यांनी सुनावले. ते पुढे म्हणाले, पाच दशकापासून रजनीकांत हे सिनेसृष्टीत आहेत. ते लोकांचे मनोरंजन करत असून त्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यामुळे निवड समितीने यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी रजनिकांत यांची निवड केली आहे. पाच सदस्यीय निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतला आहे.

शिवेंद्रराजेंना मोठा राजकीय, सामाजिक वारसा’, त्यांचा भविष्यकाळही उज्ज्वल, मी आयुष्यभर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन’ – रामराजे निंबाळकर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा केली होती. मात्र, त्यानंतर प्रकृतीचे कारण देत त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय रद्द केला. रजनीकांत यांच्या चाहत्यांनी रजनी मण्ड्राम ही संस्था स्थापन केली असून याच्या संस्थेच्या तामिळनाडूत 65 हजार शाखा आहेत. याचेच रुपांतर राजकीय पक्षात करणार होते. मात्र, ऐन निडवणुकीपूर्वी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे तामिळनाडूतील अनके राजकीय पक्ष रजनीकांत यांनी आपल्याल समर्थन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.

Also Read:

गृहमंत्री देशमुखांवर 100 कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोपानंतर आता चौकशी समितीवरून ‘कलगीतुरा’, सत्ताधारी-विरोधक ‘आमनेसामने’

IPL 2021 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका ! ‘हा’ ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज IPL च्या बाहेर

Farmers Protest : सर्वोच्च न्यायालयीन समितीची 18 राज्यातील 85 शेतकरी संघटनांसोबत चर्चा, अहवाल सुप्रीम कोर्टात सादर; लवकरच होणार सुनावणी

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या – ‘PPF वरील व्याजदर जैसे थे, तो आदेश नजरचुकीने निघाला’

Lockdown ला विरोध करणाऱ्यांना संजय राऊतांनी सुनावले, म्हणाले -‘लॉकडाऊनचे राजकारण करु नका’

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Related Posts